LIC IPO मध्ये गुंतवणूकीसाठी SBI च्या YONO वर डीमॅट खाते कसे उघडायचे?

LIC IPO
LIC IPOesakal

LIC IPO: LIC पब्लिक इश्यू हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO असणार आहे. एकदा लिस्ट झाल्यानंतर, LIC चे बाजार मूल्य RIL आणि TCS सारख्या मोठ्या कंपन्यांच्या बरोबरीचे असेल. पण, DHRP मध्ये LIC च्या बाजार व्हॅल्युएशनबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. सुमारे 16 लाख कोटी रुपयांच्या एम्बेडेड व्हॅल्युच्या तिप्पट असेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तुम्हाला एलआयसीच्या आयपीओला सबस्क्राईब करकायचे असेल तर त्याआधी डिमॅट खाते सुरु करावे लागेल. (How to open SBI YONO demat account for investment in LIC IPO)

एसबीआयने डीमॅट आणि ट्रेडिंग खाते योनो (Yono) ऍपवर सुरु करण्यासाठी ही माहिती दिली आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे. Yono ऍपवरील डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पहिल्या वर्षासाठी कोणतेही DP AMC चार्जेस लागणार नाही. अर्ज करण्यासाठी, लॉग इन करा आणि गुंतवणूक विभागात जा.

LIC IPO
Share Market : या तीन शेअर्समध्ये येत्या काळात मिळेल 20-40 टक्क्यांपर्यंत परतावा

डिमॅट खाते अगदी तुमच्या बँक खात्यासारखे असते. फरक एवढाच आहे की तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे ठेवता, तर शेअर्सच्या इलेक्ट्रॉनिक कॉपी (electronic copies) डिमॅट खात्यात ठेवता.

योनो (YONO) अॅपवर डिमॅट खाते कसे उघडायचे ?

सगळ्यात आधी प्ले स्टोअरमधून योनो अॅप डाऊनलोड करा, त्यात लॉग इन करा. त्यानंतर एक ड्रॉप डाऊन मेन्यू समोर येईल. त्यात Invest वर क्लिक करा. त्यानंतर Open Demat & Trading Account वर क्लिक करा. त्यात विचारण्यात आलेली सगळी माहिती भरा आणि नंतर कन्फर्म करा.

LIC IPO
तुम्ही Freelancers आहात? जाणून घ्या फ्रीलांसर्सचे टॅक्स नियम

डीमॅट आणि ट्रेडिंग खाते म्हणजे काय ?

तुम्ही गुंतवलेले शेअर्स किंवा सिक्युरिटीज (बॉन्ड, ईटीएफ, म्युच्युअल फंड युनिट्स इ.) डिमॅट खात्यात डिजिटल मोडमध्ये ठेवले जातात. याउलट, डीमॅट खात्यात ठेवलेल्या सिक्युरिटीजची विक्री केवळ ट्रेडिंग खात्याद्वारे करता येते. तुम्ही फक्त ट्रेडिंग खात्याद्वारे स्टॉक एक्स्चेंजवर शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीसाठी पोझिशन घेऊ शकता. ब्रोकरेज फर्म अकाउंट उघडण्यासाठी चार्जेस आकारतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com