एक भन्नाट व्यवसाय ज्याने लगेच सुरु होऊ शकते कमाई

poultry farming
poultry farmingSakal

कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) आणि लॉकडाउन (Lockdown) मुळे बऱ्याच व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. अनेक सेक्टर्स तर पूर्णतः बंद पडले. पण काही सेक्टर्सना यातून तगण्याची आशा आहे. रुळावर येणाऱ्या अर्थव्यवस्थेसोबत (Economy revival) हे व्यवसाय पुन्हा एकदा सज्ज झालेत. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबाबत सांगणार आहोत जी अगदी कमी पैशात (Low cost business) सुरू करता येऊ शकतो.

चिकन आणि अंडी यांची डिमांड आता पुन्हा वाढायला लागली आहे. त्यामुळेच कुक्कुट पालन (Poultry farming) हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. (Poultry farming) एक बड़ा अवसर है. इसे कुक्कुट पालन भी कहते हैं. कुक्कुट पालन व्यवसाय छोट्या स्वरूपापासून अगदी मोठ्या इंडस्ट्रीपर्यंत करता येतो. केंद्र आणि राज्य सरकारही कोंबडी पालन करण्याला पाठिंबा देत लोन आणि ट्रेनिंग ही देत आहेत.

poultry farming
SEBI ने केले महत्त्वाचे बदल; गुंतवणुकदारांसाठी नवीन नियम

चिकन किंवा अंडी या दोन्ही गोष्टीमुळे कोरोना व्हायरस पसरतो अशी कोणतीही पुष्टी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) च्या गाइडलाइन्समध्ये नाही. मार्केटमध्ये चिकनची डिमांड तर कायमच जास्त असते. हा व्यवसाय वाढावा यासाठी सरकारही प्रोसेसिंग, प्रजनन, पालन आणि हॅचिंग प्रक्रियांमध्ये गुंतवणूक करणार आहे.

कुक्कुट पालन (How to start poultry farming) व्यवसाय भरघोस नफा देऊ शकते. गावाकडे अत्यंत छोट्या प्रमाणावर कोंबडी पाळण्याचे काम केले जाते. सरकार यासाठी मदतही करते. फक्त कुक्कुट पालन मोकळ्या जागेत जिथे लोकांची वस्ती नसते अशा ठिकाणी करायचे. यात जास्त पाण्याचीही गरज नाही केवळ सफाईकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

poultry farming
एसबीआयचा खातेदारांना झटका, आता चार वेळेसच नि:शुल्क पैसे काढा

कुक्कुट पालन (Poultry business cost) सुरू करण्यासाठी अनेक फायननांशियल संस्थांकडून बिझनेस लोन (Business loan) घेता येते. छोट्या स्तरावर हा बिझिनेस करू इच्छिता तर कमीत कमी 50 हजार रुपयेंते 1.5 लाख रुपये इतका खर्च येतो. आणि मोठ्या स्तरावर हा बिझिनेस करायचा असेल तर जवळपास 1.5 लाख रुपये ते 3.5 लाख रुपये इतका खर्च लागू शकतो.

कुक्कुट पालन (Poultry farming loan) व्यवसायासाठी कोणत्याही सरकारी बँकेतून लोन घेता येते. SBI यासाठी लागणाऱ्या किमतीच्या 75 टक्के तक लोन देते. SBI कडून या व्यवसायासाठी जास्तीत जस्ट 9 लाख रुपये कर्ज देते. SBI ला लोन 5 वर्षांत परत करायचे असते, काही कारणास्तव 5 वर्षात लोन फेडता आलं नाही तर आणखी 6 महिन्यांचा कालावधी मिळतो.

कुक्कुट पालन (Poultry farm subsidy) व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकार सबसिडी सुद्धा देते. सरकार 25 टक्के सबसिडी देते. एससी/एसटी वर्गाला 35 टक्के सबसिडी दिली जाते.
बँकेचे लोन पाहिजे असल्यास आवश्यक कागदपत्र घेऊन जवळच्या बँकेशी संपर्क साधू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com