EPF ऑनलाइन कसा ट्रान्सफर करायचा? जाणून घ्या प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

EPF Digital Transfer

EPF ऑनलाइन कसा ट्रान्सफर करायचा? जाणून घ्या प्रक्रिया

यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आल्यानंतर कर्मचाऱ्यांचे सर्व अकाऊंट एकाच जागी असतात. पण, पैसा हा वेगवेळ्या अकाऊंटमध्ये असतो. त्यामुळे नवीन कंपनीसोबत UAN नंबर शेअर करणे गरजेचे आहे. त्यानंतर आपल्या जुन्या अकाऊंटमधील पैसा नवीन अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करता येतात. पण, ही प्रक्रिया ऑनलाइन कशी करायची? याबाबत काही टीप्स EPFO ने दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

पीएफ ट्रान्सफरसाठी कसा करायचा अर्ज? -

  1. सर्वात आधी EPFO च्या युनिफाइड मेंबर पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या वेबसाइटवर जा. इथं UAN आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.

  2. लॉग इन केल्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर जाऊन Member-One EPF Account Transfer Request या पर्यायावर क्लिक करा.

  3. याठिकाणी वैयक्तिक माहिती आणि पीएफ अकाऊंटचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. तसेच तुम्हाला तुमच्या चालू नोकरीची माहिती द्यावी लागेल.

  4. यानंतर Get Details या पर्यायावर क्लिक करा. यामध्ये तुमच्या आधीच्या कंपनीचा पीएफ तुम्हाला दिसेल.

  5. याठिकाणी ऑनलाइन क्लेम फॉर्मला अटेस्ट करण्यासाठी आधीची कंपनी आणि आताची कंपनी या दोनपैकी एक पर्याय निवडावा लागेल.

  6. सर्वात शेवटी Get OTP वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सबमिट करून क्लिक करा.

Web Title: How Transfer Epf Digitally Follow These Steps

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :EPFO