आयसीआयसीआय बँकेतर्फे व्यापाऱ्यांसाठी तत्काळ कर्ज सुविधा

Home Loan
Home LoanSakal

आयसीआयसीआय बँकेने व्यापाऱ्यांसाठी पीओएसवर आधारित अभिनव पद्धतीच्या दोन कर्ज सुविधा लाँच केल्या आहेत. ‘मर्चंट ओव्हरड्राफ्ट’ आणि ‘एक्सप्रेस क्रेडिट’ असे या योजनांचे नाव आहे.

भाजीविक्रेते, सुपर मार्केट्स, मोठी रिटेल दालने, ऑनलाइन व्यवसाय, मोठ्या ई- कॉमर्स कंपन्या आदी व्यापाऱ्यांच्या सध्याच्या आव्हानात्मक काळातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजना लाँच करण्यात आल्या आहेत. (ICICI Bank Business Loan at Lowest Interest Rates)

मर्चंट ओव्हरड्राफ्ट ही पहिली सुविधा पूर्व- मंजूरी असलेल्या आणि आयसीआयसीआय बँकेचे पीओएस लिंक असल्यास व्यापाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने व कोणत्याही कागदपत्रांशिवाय तत्काळ २५ लाख रुपये डिजिटल पातळीवरून मिळवण्याची क्षमता देते. या सुविधेमधे बँकेचे माहिती विश्लेषण वापरून नवे स्कोअरकार्ड तयार केले जाते. व्यापाऱ्याच्या पीओएस व्यवहारांवरून तसेच विविध निकष वापरून कर्ज पत जोखली जाते व त्या अनुषंगाने स्कोअरकार्ड तयार केले जाते. खेळते भांडवल पुरवण्यासाठी बँकेची नवी पत विश्लेषण पद्धत या क्षेत्रातल्या बँक स्टेटमेंट्स, आर्थिक स्टेटमेंट्स, उत्पन्न परतावे अशा पारंपरिक पद्धतींपेक्षा सुधारित आहे.

Home Loan
Infosys कडून गोड बातमी; शेअरमधून बक्कळ पैसे कमावण्याची संधी

‘एक्सप्रेस क्रेडिट’ ही दुसरी सुविधा जास्त सोयीस्कर असून त्याअंतर्गत व्यापाऱ्यांना निधी झटपट उपलब्ध होतो व आतापर्यंतच्या पद्धतींप्रमाणे पीओएस मशिनवरील विक्रीच्या मदतीने कर्ज मिळवण्यासाठी काही दिवस थांबावे लागत नाही. ही सुविधा लाँच करण्यासाठी बँकेने दुहेरी उपक्रम हाती घेतला आहे. एकामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने नेटवर्क भागिदाराबरोबर सेटलमेंटची प्रक्रिया सुलभ करून निधी वेगाने पुढे सरकेल याची खात्री करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अत्याधुनिक विश्लेषणाचा वापर करून एपीआय तयार केला जातो, व्यवहारांची तत्काळ माहिती मिळते, ग्राहकाचे प्रोफाइल तपासले जाते व काही मिनिटांत ग्राहकाच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. पैसे व्यापाऱ्याच्या लिंक केलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या करंट खात्यात २४x७, वीकेंड किंवा बँकेला सुट्टी असतानाही जमा केले जातात.

तत्काळ कर्ज सुविधा आयसीआयसीआय बँकेच्या ‘मर्चंट स्टॅक’ या सेवा श्रेणीचा भाग असून त्यामधे व्यापाऱ्यांसाठी सुपर मर्चंट करंट अकाउंट, डिजिटल स्टोअर मॅनेजमेंट आणि लॉयल्टी प्रोग्रॅम यांचा समावेश आहे.

Home Loan
मेंदूविकारांच्या अचूक निदानासाठी न्यूरोशिल्ड विकसित करणारी इनमेड प्राेग्नाॅस्टिक्स

आयसीआयसीआय बँकेच्या सेल्फ एम्प्लॉइड विभागाचे प्रमुख पंकज गाडगीळ म्हणाले, ‘सेल्फ एम्प्लॉइड आणि एमएसएमई ही क्षेत्रे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने रिटेल व्यापाऱ्यांचा समावेश आहे. सध्याच्या कठीण काळात व्यापाऱ्यांना डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत त्यांना ग्राहकांना सेवा देत राहाण्यास मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सुविधा व्यापाऱ्यांना पीओएस मशिन्सवर आधारित तत्काळ कर्ज देणाऱ्या सुविधा आहेत. या सुविधांमुळे व्यापाऱ्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होणार आहे. पीओएस व्यवहारांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पत क्षमतेचे विश्लेषण करण्यासाठी आम्ही आधुनिक माहिती विश्लेषणाचा वापर करून विविध निकषांसह नवे स्कोअरकार्ड तयार केले आहे. हा उपक्रम बँकेच्या ‘बिझनेस विथ केयर’ तत्वाशी सुसंगत आहे.’

तत्काळ कर्ज सुविधेची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणेः

  • कर्जसुविधेमुळे रिटेलर्सना मर्चंट टर्मिनल्सवरील पीओएस/क्यूआर व्यवहारांवर आधारित खेळत्या भांडवलाच्या गरजांचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.

  • आयसीआयसीआय बँकेशी जोडलेल्या व्यापाऱ्यांसाठी पूर्व मंजूर मर्यादा

  • डिजिटल प्रक्रिया

  • बँकेशी जोडलेल्या व्यापाऱ्यांना तत्काळ वितरण

  • केवल वापरलेल्या रकमेवर व्याज भरा

  • तारणमुक्त कर्ज

  • प्रीपेमेंट/फोरक्लोजर शुल्क नाही

Home Loan
'हा' शेअर हिरा आहे हिरा; आताच घेऊन ठेवा, 'हिरा' नाही पण नफ्यानंतर सोनं नक्कीच घ्याल ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com