esakal | फक्त 5 हजारांची गुंतवणूक करून कमवा बंपर पैसा, येतेय 'ही' नवीन म्युच्युअल फंड स्कीम
sakal

बोलून बातमी शोधा

Mutual-Fund

फक्त 5 हजारांची गुंतवणूक करून कमवा बंपर पैसा, येतेय 'ही' नवीन म्युच्युअल फंड स्कीम

sakal_logo
By
सुमित बागुल

वित्तीय बाजारात तुम्ही गुंतवणुकीचा नवा पर्याय शोधत आहात का ? जर असं असेल तर येत्या काळात तुम्हाला एक सुवर्णसंधी मिळणार आहे. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) लवकरच बाजारात ICICI प्रुडेन्शियल फ्लेक्सिकॅप हा नवीन फंड आणणार आहे. तशी घोषणा कंपनीने केली आहे. हा नवीन म्युच्युअल फंड एक ओपन एंडेड इक्विटी स्कीम असणार आहे. जाणून घेऊयात या नवीन NFO बाबत. (ICICI prudential mutual fund to launch flexi cap open ended NFO on 28th June)

किती पैसे गुंतवावे लागतील ?

या नवीन फंड ऑफरमध्ये किमान 5 हजार रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर किमान 1 हजार रुपये तुम्ही कितीही वेळेस गुंतवू शकतात. हा NFO येत्या 28 जून रोजी ओपन होणार असून 12 जुलै रोजी बंद होणार आहे. हा फंड एक ओपन एंडेड डायनॅमिक इक्विटी स्कीम असणार आहे. जी पुढे लार्ज, मिड आणि स्मॉल अशा तिन्ही प्रकारच्या भांडवल असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल. SNP BSE 500 या इंडेक्स अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांमध्ये या फंडाची गुंतवणूक केली जाणार आहे. यामधील समभागांची निवड त्यांच्या फंडामेंटल आणि वॅल्युवेशन वर आधारित असणार आहे.

हेही वाचा: कृत्रिम रंगांमुळे होणाऱ्या प्रदुषणाला रोखणारी स्टार्टअप 'केबीकोल सायन्सेस'

कसा होईल फायदा

ICICI प्रुडेन्शियल AMC चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO निमेश शाह यांनी या स्कीम बाबत अधिक माहिती दिली. हा फंड इक्विटी स्कीम मध्ये मोडतो आणि ही स्कीम सर्वात फ्लेक्सिबल स्कीम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या स्कीमच्या माध्यमातून प्रत्येक प्रकारच्या लहान, मध्यम आणि मोठ्या भांडवल असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंवणूक केली जाणार आहे. प्रत्येक प्रकारच्या भांडवल असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने विविधतेचा फायदा गुंतवणूकदारांना मिळेल आणि गुंतवणुकीवरील जोखीम देखील कमी होते. अनेकदा आर्थिक अनिश्चितता असल्यास मोठं भांडवल असणाऱ्या म्हणजेच लार्ज कॅप कंपन्यांमधून नुकसान होण्याची जोखीम कमी असते. तर, लहान आणि माध्यम भांडवल म्हणजे स्मॉल तसेच मिडीयम कॅप कंपन्यांमध्ये भरभराटीची शक्यता अधिक असते.

हेही वाचा: Tata Digitalची मोठी घोषणा, फार्मा ऍप 1MG मध्ये करणार गुंतवणूक

NFO म्हणजे काय ?

जेव्हा कोणतीही असेट मॅनेजमेंट कंपनी नवीन फंड बाजारात आणते तेंव्हा या फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही दिवस फंड खुला ठेवला जातो. पोर्टफोलिओसाठी शेअर्स खरेदी करण्यासाठी पैसे जमवले जातात. म्हणजेच एक नवीन फंड सुरु करण्यासाठीचे पैसे जमवले जातात. दिसायला हा एखाद्या IPO सारखाच वाटतो, मात्र NFO आणि IPO यांमध्ये फरक असतो. एखादा फंड ओपन एंडेड असल्यास काही दिवसांनी त्यामध्ये गुंतवणूक सुरु होते. मात्र एखादा फंड क्लोज एंडेड असल्यास गुंतवणूकदाराला NFO कालावधी दरम्यान आपली गुंतवणूक तशीच ठेवावी लागते.

( नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.)