पीएमसी बँकेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न 

पीटीआय
Saturday, 19 December 2020

बँकेचे प्रशासक ए. के. दीक्षित आणि टीम याची तपासणी करीत आहेत.त्यांच्या शिफारसींच्या आधारे नेमकी कोणती कंपनी या बँकेचे पुनरुज्जीवन आणि नियमितपणे कामकाज करण्यास सक्षम आहे,याचा विचार रिझर्व्ह बँक करेल.

नवी दिल्ली - संकटात सापडलेल्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेला (पीएमसी) पुनरुज्जीवित करण्यासाठी आयडियल ग्रुपच्या सुरेंद्र मोहन अरोरा यांनी इंटेंट-एलओआयचे पत्र दिले आहे. पीएमसी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी पतपत्र सादर केलेल्या तीन कंपन्यांपैकी आयडियल ग्रुप ही एक कंपनी आहे. 

आणखी बातम्या  वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पीएमसी बँकेचे प्रशासक ए. के. दीक्षित आणि त्यांची टीम याची तपासणी करीत आहेत. त्यांच्या शिफारसींच्या आधारे नेमकी कोणती कंपनी या बँकेचे पुनरुज्जीवन आणि नियमितपणे कामकाज करण्यास सक्षम आहे, याचा विचार रिझर्व्ह बँक करेल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काही महिने लागू शकतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इक्विटी गुंतवणुकीसाठी इच्छुक गुंतवणूकदारांकडून बँकेने प्रस्ताव मागविले होते. इच्छुक गुंतवणूकदारांना एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट (ईओआय) १५ डिसेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत होती. १५ डिसेंबरपर्यंत ज्या गुंतवणूकदारांनी ‘ईओआय’ सादर केला आहे, त्यांना निविदा प्रक्रियेत भाग घेता येईल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ideal Group is one of the three companies that have submitted credentials for the revival of PMC Bank

Tags
टॉपिकस
Topic Tags: