esakal | '2022 वर्षाच्या अखेरीस बीटकॉईनच्या किंमती विक्रमी वाढणार', Bitcoin चं भारतातील भविष्य काय?
sakal

बोलून बातमी शोधा

BITCOIN PRICES.

बीटकॉईनसारख्या आभासी चलनाच्या वापराला भारतात बंदी आहे. केंद्र सरकार लवकरच यासंबंधीचा कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे. पण दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर काही देशांमध्ये बीटकॉईनचा वापर वाढताना दिसत आहे

'2022 वर्षाच्या अखेरीस बीटकॉईनच्या किंमती विक्रमी वाढणार', Bitcoin चं भारतातील भविष्य काय?

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: भारतात सुरुवातीपासूनच आभासी चलनाला विरोध होत आलाय. सध्या बीटकॉईनसारख्या आभासी चलनाच्या वापराला भारतात बंदी आहे. केंद्र सरकार लवकरच यासंबंधीचा कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे. पण दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर काही देशांमध्ये बीटकॉईनचा वापर वाढताना दिसत आहे. काही उद्योजकही याच्या वापरास अनुकूल असल्याचे दिसत आहेत. बीटकॉईनसारख्या आभासी चलनाचा वापर आणि त्याची किंमत कशी वाढत गेली, तसेच भारतीय तज्ज्ञांची अभासी चलनाचं भारतातील भविष्य काय असेल याबद्दल जाणून घेणार आहोत...

जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी Bitcoin सारख्या आभासी चलनाला मान्यता दिली आहे. यामुळे भविष्यातील व्यवहार अशा आभासी पैशाने झाले तरी त्यात काही विशेष नाही. मागील काही दिवसांचा विचार केला तर ज्यांनी बीटकॉईनमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना त्याचा परतावाही भरघोस मिळाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसमोर सोन्यामधील गुंतवणुकीला पर्याय म्हणून बीटकॉईन पुढे येत आहे.

नोकरी सोडल्यानंतर स्वत:च अपडेट करा PF अकाउंट; सहज फंड मिळवण्याचे हे आहेत उपाय

Tesla ची एंट्री-
काही दिवसांपूर्वीच Tesla कंपनीने कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं होतं की, कंपनीच्या कॉर्पोरेट कॅश रिजर्व्हमधून 150 कोटी करोड डॉलर (10.9 हजार कोटी) किंमतीचे बिटकॉईन खरेदी केले होते. कंपनीच्या या घोषणेनंतर आभासी चलनाच्या बाजारात बीटकॉईनची मोठी वाढ दिसली होती. बिटकॉईनच्या मूल्यात वाढ होऊन, एका बीटकॉईनची तब्बल 44 हजार 795 डॉलरवर (32.6 लाख रुपये) पोहचली होती. या व्यतिरिक्त कंपनीने आपल्या ग्राहकांना बिटकॉइनवर इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास परवानगी देणार असल्याचेही सांगितले आहे.

"आभासी चलनाचा वापर अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचं आहे. सामान्य लोकांना याचा काहीही उपयोग नाही. बीटकॉईनला भविष्यात चलन म्हणून अजिबात पाहता येणार नाही. अशा आभासी चलनात मोठ्या प्रमाणात अस्थिरता असते, त्यामुळे त्याचा वापर धोकादायक ठरेल"- अर्थतज्ञ डॉ. राजस परचूरे ( संचालक, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे)

एका बीटकॉईनची किंमत 1 लाख डॉलरपर्यंत जाणार-
क्रिप्टोकरन्सी इन्व्हेस्टमेंट फर्म गॅलेक्सी डिजिटलचे संस्थापक मायकेल नोव्होग्राट्झ म्हणतात की, 'कंपन्या ज्या पद्धतीने बिटकॉइनचा वापर वाढवीत आहेत ते पाहता या वर्षाच्या अखेरीस बिटकॉइनची किंमत 1 लाख डॉलर (76.48 लाख रुपये) पर्यंत पोहोचेल.' 

सलग चार दिवस बँका राहणार बंद; खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी पुकारला संप
 
सध्या एका बिटकॉइनची किंमत सुमारे 46 हजार 800 डॉलर्स (34 लाख रुपये) आहे. नोव्होग्राट्झ यांच्या मते, अधिकाधिक कंपन्या त्यांच्या ग्राहकांना बिटकॉइनच्या माध्यमातून खरेदी करण्यास परवानगी देत ​​आहेत. 2020 मध्ये ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांना चार पट परतावा मिळाला आहे. तसेच मागील दोन वर्षात गुंतवणूकदारांना सुमारे 9 पट नफा प्राप्त झाला आहे.

"सध्या जागतिक पातळीवर काही कंपन्या स्वतःची एकाधिकारशाही गाजवण्यासाठी या आभासी चलनाचा वापर करत आहेत. हे चलन सार्वत्रिक नाही, वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये याचं स्थान वेगळं आहे. या चलनाकडे सुविधा म्हणून पाहता येईल पण ते सार्वत्रिक असू शकत नाही. बिटकॉईनचा वापर वाढला तर भविष्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. या अभासी चलनाच्या वापरात सुलभता नसल्याने फसवणुकींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत"- अर्थतज्ञ प्रा. एच. एम. देसरडा

भविष्यात बिटकॉइनची 'चलती'-
मायकेलने ब्लूमबर्ग यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'टेस्लाने ज्या प्रकारे आपली कार विकत घेण्यासाठी बिटकॉइनचा वापर करण्यास मान्यता दिली आहे, तशी प्रत्येक अमेरिकन कंपनी लवकरच करणार आहे. गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की, अन्य कंपन्यांकडेही बिटकॉईनच्या स्वरूपात त्यांच्या राखीव भागाचा मोठा हिस्सा असेल, जो महागाई किंवा डॉलरच्या कमकुवतेपासून बचाव करेल. तसेच बिटकॉइन हे भविष्यातील चलन असेल.'

सोनं 16 वर्षांत 7000 वरुन पोहोचले तब्बल 56000 हजारांवर !

"सरकार आता या आभासी चलनावर बंदी आणू पाहत आहे ते योग्य आहे. हा एक आर्थिक उत्क्रांतीचा भाग असू शकतो पण पर्याय असणार नाही. याच्या वापरावर कोणीच नियामक नसल्याने अभासी चलन वापरणे धोकादायक आहे. असे आभासी चलन जर वापरात आली तर कररचनेवर परिणाम होऊन अर्थव्यवस्था ढासळतील"- प्रा. धनश्री महाजन ( अर्थशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)

2009 मध्ये 1 डॉलरमध्ये हजारो बीटकॉईन-
एलॉन मस्क यांच्या घोषणेनंतर जागतिक आभासी चलनाच्या बाजारात मोठी तेजी आल्याचे दिसले होते. बीटकॉईनचा इतिहास पाहिला तर त्याच्या वापराची सुरुवात 2009 पासून झाली. त्यावेळेस एका डॉलरमध्ये तब्बल 1309 बीटकॉईन येत होते. आजची स्थिती पाहिली तर ही आज एका बीटकॉईची किंमत 47 हजार डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. भारतात बीटकॉईनचा वापर करावे की नाही, या मुद्द्यावर सध्या केंद्र सरकार विचाराधीन आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top