घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मार्च 2021 पूर्वी घ्या PM आवास योजनेचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aawas

केंद्र सरकार पीएम आवास योजनेअंतर्गत (PM Awas yojana) क्रेडिट लिंक्ड सब्सिडी स्कीमच्या (CLSS) माध्यमातून व्याजावर सूट देत आहे.

घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मार्च 2021 पूर्वी घ्या PM आवास योजनेचा लाभ

नवी दिल्ली- केंद्र सरकार पीएम आवास योजनेअंतर्गत (PM Awas yojana) क्रेडिट लिंक्ड सब्सिडी स्कीमच्या (CLSS) माध्यमातून व्याजावर सूट देत आहे. केंद्र सरकार या योजनेचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढवणार आहे. याची घोषणा फेब्रुवारीमधील बजेटमध्ये केली जाण्याची शक्यता आहे. सध्या ही योजना 31 मार्च 2021 पर्यंत आहे. जर तुम्ही अजून या योजनेचा फायदा घेतलेला नसेल, तर 31 मार्च 2021 पर्यंत असं करु शकता. त्यामुळे नवीन घर किंवा प्लॅट घेणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. व्याजाच्या रुपात त्यांच्या लाखो रुपयांची बचत होणार आहे. 

योजनेचा लाखो लोकांना फायदा

या योजनेअंतर्गत पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना होम लोनवर व्यास सबसिडी दिली जाते. ही सबसिडी कमाल 2.67 लाख रुपयांपर्यंत असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बजेटसंबंधी होणाऱ्या बैठकीत यासंबंधी सहमती झाली आहे. कोरोनाचे संकट पाहता केंद्र सरकारने या योजनेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा फायदा कमी आय असणाऱ्यांसोबतच रियल सेक्टरवाल्यांना होईल. 

भाजपचे ‘नवा गडी, नवे राज्य’; मित्रपक्षाची साथ सोडत आसाममध्ये नवी आघाडी

असं चेक करा आपले नाव

सर्वातआधी rhreporting.nic.in/netiay/Benificiary.aspx वेबसाईटवर जा
रजिस्ट्रेशन नंबर असल्यास तो भरुन क्लिक करा, ज्यानंतर तुम्हाला डेटा दिसेल
रजिस्ट्रेशन नंबर नसल्यास Advance वर क्लिक करा
फॉर्म भरा आणि Search वर क्लिक करा
नाव  PMAY G मध्ये असल्यास, सर्व संबंधित माहिती दिसेल

कोणत्या उत्पन्न गटातील वर्गाला मिळणार सबसिडी

3 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना EWS सेक्शन 6.5 टक्के सबसिडी
3 लाख ते 6 लाख उत्पन्न असलेल्यांना LIG 6.5 टक्के सबसिडी
6 लाख ते 12 लाख उत्पन्न असलेल्यांना MIG1 4 टक्के  क्रेडिट लिंक सबसिडी
6 लाख ते 12 लाख उत्पन्न असलेल्यांना MIG2 सेक्शनमध्ये 4 टक्के क्रेडिट लिंक सबसिडी

कोणाला होणार फायदा

1. पक्के घर नसायला हवे, आधीच घर असल्याच लाभ नाही
2.कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा
2. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी Aadhaar आवश्यक

काय आहे पीएम आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना भारत सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली स्कीम आहे. जिचा उद्देश लोकांना शहरी आणि ग्रामीण भागात स्वस्त दराने घर उपलब्ध करुन देण्याचा आहे. याअंतर्गत पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना क्रेडिट लिंक्ड सबसिडी दिली जाते. 

Web Title: Important News Home Buyers Take Advantage Pm Awas Yojana March 2021

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..