...तर असे करा ''फायनान्शिअल प्लॅनिंग''!

सोमवार, 1 एप्रिल 2019

पुणे: योग्य वेळी योग्य पद्धतीने आर्थिक गुंतवणूक केल्यास आपली उद्दिष्टे साध्य करता येणे शक्य आहेत. मात्र आपल्या उद्दिष्टानुसार गुंतवणूक समजून घेतली पाहिजे. आर्थिक नियोजन अर्थात फायनान्शिअल प्लॅनिंग हे भविष्यातील आपली गरज आणि चलनवाढ ओळखून करणे गरजेचे आहे. शिवाय चलनवाढीचा दर लक्षात घेऊन आपल्या विविध उद्दिष्टांसाठी केव्हा आणि किती पैसे लागणार आहेत, ते तपासून पुढील खर्चाचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरते.

बऱ्याचदा गुंतवणूकदारांकडून सांगितले जाते की, मी नियमितपणे शेअर बाजारात गुंतवणूक करतो. शिवाय एसआयपी सुरु केली आहे. पीपीएफमध्ये देखील दरवर्षी पैसे टाकतो. मात्र हे नियमितपणे करणे म्हणजे 'फायनान्शिअल प्लॅनिंग' होत नसते. 

'फायनान्शिअल प्लॅनिंग'बाबत सांगत आहेत गुंतवणूक तज्ज्ञ सुहास राजदेरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Steps to Creating a Smart Financial Plan