सॅमसंगच्या सर्वांत मोठ्या प्रकल्पाचे उद्‌घाटन

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

नोएडा - सॅमसंगच्या जगातील सर्वांत मोठ्या उत्पादन प्रकल्पाचे सोमवारी (ता.९) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. नोएडामधील या प्रकल्पामुळे सॅमसंगची उत्पादन क्षमता १२ कोटी मोबाईल्सपर्यंत वाढणार आहे. सॅमसंग हा भारताचा दीर्घकालीन भागीदार राहिला आहे. नोएडातील हा प्रकल्प मेक इन इंडियाशी कटिबद्ध असल्याचे दर्शवतो, असे सॅमसंग इंडियाचे सीईओ एच. सी. होंग यांनी सांगितले. सॅमसंगचा हा जगातील सर्वांत मोठा प्रकल्प असून, यामुळे सॅमसंगची मोबाईल निर्मिती दुपटीने वाढणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inauguration of Samsung largest project