Income Tax Return | अजुनही Refund मिळाला नाही? जाणून घ्या काय आहेत कारणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Income Tax Return

इन्कम टॅक्सची नवी वेबसाइट आल्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणे सोपे आणि पेपरलेस झाले आहे.

Income Tax Return : अजुनही Refund मिळाला नाही? जाणून घ्या काय आहेत कारणं

इन्कम टॅक्सची नवी वेबसाइट आल्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणे सोपे आणि पेपरलेस झाले आहे. आयटीआर वेळेवर भरण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो, कारण जितक्या लवकर ते इन्कम टॅक्स रिटर्न भरतील, तेवढेच लवकर रिटनर्ही मिळेल. 6.25 कोटी करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरले होते, ज्यात 4.5 कोटी लोकांना रिफंड मिळाला आहे. अशा परिस्थितीत आपणास अद्याप परतावा (Refund) मिळालेला नाही, अशी शक्यता आहे. याचे कारण काय असू शकते ते जाणून घेऊया.

हेही वाचा: Income Tax Return: चुकीची दुरुस्ती करण्याची संधी

1. टेक्निकल इश्यू- इन्कम टॅक्सच्या नव्या पोर्टलवर विविध तांत्रिक अडचणींमुळे रिटर्न मिळण्यासही विलंब होत आहे. कदाचित तुमचा परतावा न मिळण्याचे हे एक कारण आहे.

2. अतिरिक्त डाक्युमेंट्स- परतावा मिळण्यास उशीर होण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे अतिरिक्त कागदपत्रेही असू शकतात. अशावेळी ही समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याशी दूरध्वनी किंवा पोस्टाद्वारे संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रे सादर करा.

हेही वाचा: Income Tax Returns भरत आहात? नेहमी होणाऱ्या सर्वसाधारण चुका टाळा

3. इन्कम टॅक्स रिटर्नची पडताळणी न होणे - रिफंड न मिळण्याचे एक कारण म्हणजे पडताळणीही (Verification). जर तुमचा आयटीआरही ठरलेल्या मुदतीत व्हेरिफाय झाला नाही, तर तो अवैध मानला जाईल. आयकर कायदा, 1961 अंतर्गत, ज्या आयटीआरची पडताळणी केली जात नाही, त्यांना अवैध घोषित केले जाते.

4. बँकेशी संबंधित माहिती - बँक डिटेल्समध्ये जरी बदल झाला असेल तरीही तुम्हाला रिफंड मिळण्यास उशीर होऊ शकतो. जर तुमच्या प्राथमिक खात्याचा मोबाइल क्रमांक आणि ई-मेलसारखी माहिती नव्या खात्यातून मिळत राहिली, तर ते खातेही वैध ठरेल. त्याचबरोबर माहिती बदलली असेल तर पोर्टलवर वॉर्निंग पोर्टल दिसेल.

5. तुमचा रिफंड स्टेटसची स्थिती अशी तपासू शकता-

स्टेप 1- इन्कम टॅक्स पोर्टलवर युजर आयडी पासवर्डद्वारे लॉगइन करा.

स्टेप 2- My Account मध्ये जाऊन 'Refund/Demand Status'वर क्लिक करा.

स्टेप 3- सर्व माहिती तुमच्यासमोर येईल. रिफंड दिला नसेल तर 'Reason'वर जाऊन तुम्ही लगेच स्टेटस तपासू शकता.

Web Title: Income Tax Return Refund Not Received These Are The Reasons Check Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..