Gold Rate : सोन्याच्या दरात घसरण; उच्चांकी किमतीपेक्षा ४ हजारांनी स्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold prices 4 thousand cheaper than highest price

Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण; उच्चांकी किमतीपेक्षा ४ हजारांनी स्वस्त

मुंबई : केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र सोन्याच्या दरात वाढ होत राहिल्याचे पाहायला मिळाले. सलग सुट्ट्यांनंतर मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या आजच्या दरात घसरण दिसून आली. एकूणच आज सराफा बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. सोन्यचा दर आतापर्यंतच्या उच्चांकी दरापेक्षा ४,०२० रुपयांनी स्वस्त राहिला. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ५६,२०० उच्चांकी किमतीवर पोहचला होता.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननुसार आज सोन्याचा दर ५२१८० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे; तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो ५२४६१ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता. अशा प्रकारे आज सोन्याचा दर २८१ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे; तर मंगळवारी चांदीचा दर प्रति किलो ५७०९५ रुपये होता. शेवच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी ५८३५२ प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली.

Web Title: Increase Import Duty On Gold Central Govt Fall In Gold Prices 4 Thousand Cheaper Than Highest Price Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..