भारत अग्रगण्य डिजिटल समाज बनणार - मुकेश अंबानी

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

मुंबई : भारत जगातील अग्रगण्य डिजिटल समाज बनण्याच्या मार्गावर असून, देशाची अर्थव्यवस्था जगातील आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनेल, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘फ्युचर डिकोडेड सीईओ समिट’मध्ये मुकेश अंबानी यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्याशी संवाद साधला. या वेळी अंबानी म्हणाले, ‘‘भारतातील या मोठ्या बदलांमध्ये वेगवान मोबाईल नेटवर्कच्या प्रसाराचा महत्त्वाचा वाटा आहे. पंतप्रधानांनी आम्हाला २०१४ मध्ये डिजिटल भारताचे स्वप्न दाखविले, तेव्हाच याची सुरुवात झाली. जिओच्या ४ जी तंत्रज्ञानाकडे ३८ कोटी नागरिक वळले आहेत.

भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. फक्त हे पाच वर्षांत होते की दहा वर्षांत, एवढेच पाहावे लागेल. आपले बालपण ज्या वातावरणात गेले, त्यापेक्षा अगदी वेगळा भारत पुढील पिढीला दिसेल.’’ रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर क्‍लाउड तंत्रज्ञानासंदर्भात मायक्रोसॉफ्टने केलेल्या भागीदारीचा उल्लेख सत्या नडेला यांनी या वेळी केला. मायक्रोसॉफ्टने २०१९ मध्ये रिलायन्सबरोबर १० वर्षांचा करार केला आहे. रिलायन्सच्या डेटा सेंटरना तंत्रज्ञानाचे पाठबळ देण्यासंदर्भातील हा करार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India to become the leading digital society says mukesh ambani