#MainBhiBerozgar मोदींच्या काळात नोकऱ्याच गायब; हा घ्या पुरावा!

वृत्तसंस्था
Saturday, 30 March 2019

2017-18 या वर्षामध्ये बेरोजगारीत 6.1 टक्के इतकी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली : देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मोदी सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणने (एनएसएसओ) केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 2017-18 या वर्षामध्ये बेरोजगारीत 6.1 टक्के इतकी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी काळापैसा भारतात परत आणला जाईल, बेरोजगार तरुणांना रोजगार दिला जाईल, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे, यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर आश्वासन दिले होते. मात्र, एएसएसओने केलेल्या सर्वेक्षणातून बेरोजगारीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. बेरोजगारीत 6.1 टक्क्याने वाढ झाली आहे.

मागील चार दशकातील बेरोजगारीपेक्षा अधिक बेरोजगारी 2017-18 या वर्षात होती. यापूर्वी 1972-73 या वर्षी सर्वात जास्त बेरोजगारी निर्माण झाली होती. मात्र, आता म्हणजे जवळपास चार दशकानंतर 2017-18 पुन्हा एकदा हीच परिस्थिती निर्माण झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India unemployment rate highest in 45 years