
कोरोनाच्या केसेसमध्ये लक्षणीय घट झाली आहे. भारताने 22 ऑक्टोबरपर्यंत 100 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण केलं आहे. त्यामुळे सध्या आयटी पार्क असणारी शहरं पुन्हा रुळावर येत आहेत. सरकारी कार्यालयांसह अनेक आस्थापनं पुन्हा ऑफलाईन पद्धतीने सुरू होत आहेत. त्यामुळे कार्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसला बोलवण्याचं काम सुरू आहे. आता घरून काम करण्याची संस्कृतीही हळूहळू कमी होत आहे. एक वर्षापेक्षा जास्त काळ घरातून काम केल्यानंतर, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी सारख्या आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्याची योजना उघड केली आहे.
देशातील सर्वात मोठी आयटी फर्म टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने म्हटले आहे की, ते आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातील डेस्कवर परत बोलावतील. कारण त्यांच्यापैकी जवळपास 70 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. आणि सुमारे 95 टक्के लोकांनी लशीचा एक डोस घेतला आहे. कंपनीचे ह्युमन रिसोर्स अधिकारी मिलिंद लक्कर यांनी सांगितलं की, कंपनी कर्मचाऱ्यांना वर्षाच्या अखेरीस कार्यालयात बोलवण्याचा विचार करत आहे.
वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ते 90 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवतील,अशी माहिती टीसीएस कंपनी प्रशासनाने दिली होती. आयटी फर्मने कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे.
इन्फोसिस करणार हायब्रिड मॉडेलचा अवलंब
देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने म्हटले आहे की, ते आता काम करण्यासाठी हायब्रिड मॉडेलचा अवलंब करणार आहेत. कोरोना साथीच्या काळात लोकप्रिय झालेल्या हायब्रिड मॉडेलमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणाहून काम करण्याची परवानगी आहे. कंपनीचे सीओओ प्रवीण राव यांनी सांगितले की, त्यांच्या 86 टक्के कर्मचाऱ्यांनी कमीतकमी एक डोस घेतला आहे. आता कंपनी हायब्रिड मॉडेलसह पुढे जाईल.
इन्फोसिस प्रमाणेच मॅरिको आणि विप्रो सारख्या कंपन्या देखील हायब्रिड मॉडेलचा अवलंब करत आहेत. कर्मचाऱ्यांचा ट्रॅव्हलिंगमध्ये जाणारा वेळ वाचवण्यासोबतच कंपन्यांना जागेचं भाडं आणि वीज खर्च कमी करण्यास मदत करत आहे.
विप्रोचे प्रमुख रिषद प्रेमजी यांनी 12 सप्टेंबर रोजी ट्विट केले होते आणि म्हटले होते की, "आमच्या कंपनीचे कर्मचारी उद्या म्हणजेच 13 सप्टेंबरपासून आठवड्यातून दोनदा कार्यालयात येतील. सर्वांचं पूर्णपणे लसीकरण झालं आहे. सोशल डिस्टन्स आणि सुरक्षा नियमांचे पालन कर्मचारी करतील. आणि आम्हीही यावर लक्ष ठेवू."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.