निर्देशांक सेन्सेक्‍स 886 अंशांनी घसरून 31 हजार 123 अंशांवर बंद

वृत्तसंस्था
Friday, 15 May 2020

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 886 अंशांनी घसरून 31हजार 123अंशांवर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 241अंशांच्या घसरणीसह 9हजार143अंशांवर बंद झाला.

मुंबई - देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर होऊनही जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांमध्ये गुरुवारी निराशेचे वातावरण होते. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 886 अंशांनी घसरून 31 हजार 123 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 241 अंशांच्या घसरणीसह 9 हजार 143 अंशांवर बंद झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एनबीएफसी, एमएसएमई, रिअल इस्टेट आणि ऊर्जा क्षेत्राला गती देण्यासाठी सरकारने 5.94 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मात्र, जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज गुंतणूकदारांमध्ये चैतन्य निर्माण करण्यास अपयशी ठरले. परिणामी बीएसई आणि एनएसईवरील बहुतेक सर्वच निर्देशांक नकारात्मक व्यवहार करून बंद झाले. 

क्षेत्रीय पातळीवर एफएमसीजी आणि फार्मा निर्देशांक वगळता सर्वच निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले होते. बॅंकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि आयटी निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली. सेन्सेक्‍सच्या मंचावर टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी, इंड्‌सइंड बॅंक आणि रिलायन्सच्या समभागामध्ये सर्वाधिक घसरण झाली, तर हिरोमोटोकॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, एलअँडटी आणि सनफार्माचे समभाग वधारले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रुपया घसरला 
चलन बाजारात रुपयात 9 पैशांनी घसरण होऊन डॉलरच्या तुलनेत रुपया 75.56 या पातळीवर स्थिरावला. 

शेअर बाजारात घसरण का? 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून, पुढील काही काळासाठी ती कमकुवत राहील, असे अमेरिकी मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी म्हटले आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Share markets fell 2.5 percent lower on Thursday