Share Market: शेअर बाजारात जबरदस्त उसळी, गुंतवणूकदारांची चांदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stock Market Opening

Share Market: शेअर बाजारात जबरदस्त उसळी, गुंतवणूकदारांची चांदी

भारतीय शेअर बाजारासाठी आठवड्यातील पहिला एक दिवस चढ-उताराचा ठरला. सोमवारी बाजारात कमालीची घसरण दिसून आली पण आज शेअर बाजार चांगलाच सावरलेला दिसून आला आहे. आज सेन्सेक्स 1,276 अंकाच्या तेजीसह 58,065 वर बंद झाला तर निफ्टी 58,065 अंकाच्या तेजीसह 17,274 वर बंद झाला आहे. (Share Market Update)

आठवड्याभरापासून शेअर मार्केट प्रचंड डाऊन होते यामुळे गुंतवणूकदारांमध्ये ताण दिसून आला होता. मात्र आठवड्याच्या शेवटी आज शेअर बाजारात तेजी दिसून आली त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 1000 अंशांची उसळी झाली असून, निफ्टीमध्येही ४०० अंशांची वाढ झाली होती . सकाळच्या सत्रात बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर बाजारात सेन्सेक्समध्ये 1,197 हून अधिक अंकांची तेजी दिसून आली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 346 अंकांनी वधारला आणि 17,234 अंकांवर खुला झाला होता. तर सेन्सेक्स 58,027 अंकांवर खुला झाला होता.