भारतात ई- कॉमर्स बाजारपेठ १२० अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

digital wallet
भारतात ई- कॉमर्स बाजारपेठ १२० अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता

भारतात ई- कॉमर्स बाजारपेठ १२० अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता

मुंबई - भारताची ई- कॉमर्स बाजारपेठ २०२२-२३ दरम्यान ९६ टक्क्यांनी वाढून १२० अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता असून, ई- कॉमर्स पेमेंट्ससाठी डिजिटल वॉलेट्स, बीएनपीएल पद्धतींचा वापर वाढेल, असा अंदाज एफआय वर्ल्डपेच्या २०२२ ग्लोबल पेमेंट्स रिपोर्टमध्ये (जीपीआर) व्यक्त करण्यात आली आहे.

भारतात तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनमध्ये प्रगती झाल्यापासून कॅशलेस पेमेंट्सचा वापर करण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. २०२१ मध्ये सर्वाधिक पसंतीच्या व्यवहार पद्धती असलेल्या प्रीपेड कार्डस्‌, कॅश ऑन डिलीव्हरी, रोख पैसे , क्रेडिट, डेबिट कार्डच्या वापराचे प्रमाण आता कमी होत चालले आहे.

त्याशिवाय, बाय नाऊ पे लेटर अर्थात ‘बीएनपीएल’ ही भारतातील वेगाने विकसित होत असलेली ऑनलाइन पेमेंट पद्धत आहे. बीएनपीएल सेवा ग्राहकांना वन- टाइम इनव्हॉइस किंवा निश्चित सुलभ हप्त्यांमध्ये सेवा किंवा उत्पादनांचे पैसे भरण्याची भुमा देते. ही पद्धत ई- कॉमर्स बाजारपेठेच्या मूल्याच्या २०२१ मधील ३ टक्क्यांवरून २०२३ मध्ये ८.६ टक्क्यांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे.

भारताची पॉइंट-ऑफ-सेल बाजारपेठ २०२१ ते २०२५ दरम्यान २८.८ टक्क्यांनी वाढणे अपेक्षित असून तेव्हा ती १.०८ ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार करेल. २०२१ मध्ये इन- स्टोअर पेमेंट्साठी रोख पैशांना प्राधान्य दिले जात होते. त्यानंतर डिजिटल वॉलेट्सचे प्रमाण २४.८ टक्के आणि क्रेडिट कार्डस्‌चे प्रमाण १८.१ टक्के होते.

मात्र, २०२३ पर्यंत डिजिटल वॉलेट्स रोख पैशांना मागे टाकतील व व्यवहारातील त्यांचा वाटा ३०.८ टक्के असेल असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

डिजिटल वॉलेट्सचे वाढेल वर्चस्व

भारतात २०२५ पर्यंत डिजिटल वॉलेट्स पद्धती ई- कॉमर्स पेमेंट पद्धतींवर वर्चस्व गाजवतील आणि त्यांचा एकूण व्यवहार मूल्यातील वाटा ५२.९ टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२५ पर्यंत ई-कॉमर्सच्या व्यवहारातील डिजिटल वॉलेट्सचा वाटा ४५.४ टक्के असेल. त्यानंतर डेबिट कार्डस्‌चा वाटा १४.६ टक्के, क्रेडिट कार्डस्‌चा वाटा १३.३ टक्के असेल, तर रोख आणि अन्य पद्धतींचा एकूण वाटा फक्त ८.८ टक्के असेल.

Web Title: Indias Ecommerce Market Is Expected To Reach 120 Billion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaArthavishwa
go to top