esakal | मोदींमुळेच अर्थव्यवस्थेचा 300 वर्षांतील सर्वोत्तम काळ : नारायण मूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींमुळेच अर्थव्यवस्थेचा 300 वर्षांतील सर्वोत्तम काळ : नारायण मूर्ती

मोदींमुळेच अर्थव्यवस्थेचा 300 वर्षांतील सर्वोत्तम काळ : नारायण मूर्ती

sakal_logo
By
वृत्तसंस्था

गोरखपूर: इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. मागील 300 वर्षातील हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा सर्वोत्तम काळ आहे. पहिल्यांदाच अर्थव्यवस्था इतक्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मक वातावरणात उभी आहे. या परिस्थितीत भारतातील गरिबी दूर करण्याची संधी आहे. देशातील गरिबी दूर करत प्रत्येक भारतीयासाठी उत्तम भविष्यकाळ निर्माण करण्याची संधी सध्याच्या अर्थव्यवस्थेत आहे, असे मत नारायण मूर्ती यांनी गोरखपूर येथील मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या एका पदवी प्रदान समारंभात व्यक्त केले आहे. 

जर आपण प्रयत्न केले तर आपण महात्मा गांधीजींच्या इच्छेनुरुप देशातील गरिबांचे अश्रू पुसू शकू. 'मेरा भारत महान'चा नारा देणे सोपे आहे मात्र चांगल्या मूल्यांना आचरणात आणणे खूप कठीण असते. देशभक्तीचा खरा अर्थ म्हणजे आपण प्रत्येक भारतीयाकडून सर्वोत्तम कसे मिळवू शकतो. भारताची अर्थव्यवस्था 6 ते 7 टक्के विकासदराने विस्तारते आहे. भारत हा जगाचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट केंद्र झाला आहे. आपली परकी गंगाजळीसुद्धा 400 अब्ज डॉलरच्या वर पोचली आहे. गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. 

तर दुसरीकडे शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. देशातील 35 कोटी नागरिकांना लिहिता किंवा वाचता येत नाही. 20 कोटी नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. 75 कोटी भारतीयांना स्वच्छतेशी आणि आरोग्याशी संबंधित सुविधा उपलब्ध नाही. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आपण जगात बरेच मागे आहोत. या मुद्द्यांवर भरपूर काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत यावेळी नारायण मूर्ती यांनी मांडले.

loading image
go to top