
देशाचा महागाई दर सप्टेंबरमध्ये ७.३४ टक्क्यांवर पोचला आहे. हाच दर ऑगस्टमध्ये ६.६९ टक्के इतका होता. सरकारने दिलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली.
Entertainment नवी दिल्ली - देशाचा महागाई दर सप्टेंबरमध्ये ७.३४ टक्क्यांवर पोचला आहे. हाच दर ऑगस्टमध्ये ६.६९ टक्के इतका होता. सरकारने दिलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जानेवारीनंतर सध्या चलनवाढीचा दर उच्चांकीपातळीवर आहे. गेल्या काही दिवसांपासून अन्नधान्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यानुसार अन्नधान्यांचा महागाई दर सप्टेंबरमध्ये वाढला असून तो १०.६८ टक्क्यांवर पोचला. हाच दर ऑगस्टमध्ये ९.०५ टक्के एवढा होता. यादरम्यान, लॉकडाउनमुळे बाजारपेठ ठप्प पडलेली असताना गेल्या दोन महिन्यांपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादनात ८ टक्क्याने घट झाली आहे.
विशेषत: उत्पादन, खाण उत्खनन, ऊर्जा निर्मिती क्षेत्रात घसरण झाल्याने औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या माहितीनुसार, उत्पादन क्षेत्रात घसरण ८.६ टक्के झाली आहे.
Edited By - Prashant Patil