घाऊक चलनवाढ कमी झाली; डिसेंबर मध्ये ४.९५ टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inflation

डिसेंबर २०२२ महिन्यात घाऊक किमतीवर आधारित देशातील चलनवाढ कमी होऊन ४.९५ टक्क्यांवर आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Inflation : घाऊक चलनवाढ कमी झाली; डिसेंबर मध्ये ४.९५ टक्के

नवी दिल्ली - डिसेंबर २०२२ महिन्यात घाऊक किमतीवर आधारित देशातील चलनवाढ कमी होऊन ४.९५ टक्क्यांवर आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. नोव्हेंबर महिन्यातील या चलनवाढीचा दर ५.८५ % होता.

अन्नपदार्थ तसेच कच्च्या तेलाचे (इंधन) दर घसरल्यामुळे ही चलनवाढ कमी झाल्याचे दाखवून दिले जात आहे. नोव्हेंबर महिन्यातील या चलनवाढीचा दर ५.८५ % होता तेथून तो आता सुमारे ०.९० अंशांनी कमी झाला आहे. तर डिसेंबर २०२१ मध्ये हा दर तब्बल १४.२७ टक्के होता.

अन्नपदार्थांची चलनवाढ उणे १.२५ टक्के तर इंधन व ऊर्जा यांची चलनवाढ १८.०९% होती. उत्पादित वस्तूंमधील चलन वाढ ३.३७ % एवढीच राहिली अशी माहिती केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्रालयाने आज दिली आहे.

अन्नपदार्थ, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम पदार्थ, क्रूड ऑइल रसायने आणि रासायनिक पदार्थ तसेच कापड या पदार्थांची चलनवाढ कमी झाल्यामुळे डिसेंबर महिन्यातील चलनवाढ कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :inflationDecrease