इन्फोसिसमध्ये हजारो कर्मचाऱ्यांना 'ले-ऑफ'

Infosys lays off mid, senior level executives
Infosys lays off mid, senior level executives
Updated on

बंगळुर: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसमध्ये मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे. कॉग्निझंटनंतर आता इन्फोसिसनेही कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबिला आहे. सुमारे 2,200 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. कंपनीने विविध पातळ्यांवरील कर्मचाऱ्यांना इन्फोसिसने 'ले-ऑफ' दिले आहेत. यात वरिष्ठ व्यवस्थापक पदावरील (लेव्हल 6) 10 टक्के कर्मचारी म्हणजेच जवळपास 2,200 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इन्फोसिसमध्ये लेव्हल 6,7,8 या पातळीवर 30,092 कर्मचारी आहेत. तर लेव्हल 3,4,5 या पातळ्यांवरील 2 ते 5 टक्के कर्मचारी कपात कंपनीकडून होण्याची शक्यता आहे. 

कंपनीच्या कर्मचारी कपातीचा सुमारे 4,000 ते 10,000 कर्मचाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.  वरिष्ठ स्तरावरील म्हणजेच सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कार्यकारी उपाध्यक्षांसारख्या 50 अधिकाऱ्यांना देखील नोकरीला मुकावे लागणार आहे. व्यावसायिक बाबींमुळे इन्फोसिसला हे पाऊल उचलावे लागते आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इन्फोसिसने दिलेल्या 'ले-ऑफ'पेक्षा यावेळेच प्रमाण मोठे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com