पायाभूत क्षेत्रातील उत्पादनात वाढ 

पीटीआय
Tuesday, 2 July 2019

मे महिन्यात 5.1 टक्के वृद्धीदर 
नवी दिल्ली:  पोलाद उत्पादनातील प्रचंड वाढ आणि वीज निर्मितीने मे महिन्यात आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांचा वृद्धीदर 5.1 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात या प्रमुख क्षेत्रांचा वृद्धीदर 4.1 टक्के होता. 

कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा या अर्थव्यवस्थेतील आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांची कामगिरीचे एकूण औद्योगिक उत्पादनावर पडसाद उमटतात. केंद्र सरकारच्या माहितीनुसार मे 2019 मध्ये आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांचा वृद्धीदर 5.1 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला. मे 2018 मध्ये तो 4.1 टक्के होता. यंदा पोलाद उत्पादनात 19.9 टक्‍क्‍यांची वाढ झाली. त्याचबरोबर वीज निर्मितीत 7.2 टक्‍क्‍यांची वृद्धी नोंदवण्यात आली आहे. मात्र याच महिन्यात कच्चे तेल, रिफायनरी उत्पादने आणि खत निर्मितीत घट झाली. एप्रिल ते मे या दोन महिन्यांच्या कालावधीत या प्रमुख पायाभूत क्षेत्रांची समाधानकारक कामगिरी राहिली. दोन महिन्यात वृद्धीदर 5.7 टक्के राहिला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infrastructure output increases 5.1 per cent in May year-on-year