जिओमध्ये आणखी एक मोठी गुंतवणूक; आता कोणी केली गुंतवणूक?

वृत्तसंस्था
Friday, 3 July 2020

जिओ फ्लॅटफॉर्मवर अनेकजण सध्या गुंतवणूक करत आहेत. आता इंटेल कॅपिटल ही कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे.

मुंबई : जिओ फ्लॅटफॉर्मवर अनेकजण सध्या गुंतवणूक करत आहेत. आता इंटेल कॅपिटल ही कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये सातत्याने गुंतवणूक होत असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्मसकडून आज (ता. ०३) देण्यात आली. गेल्या दोन महिन्यांमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणारी इंटेल कॅपिटल ही ११ वी कंपनी ठरणार आहे. तर, जिओमध्ये होणारी ही १२ वी गुंतवणूक असणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

इंटेल कॅपिटल जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये तब्बल १८९४.५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. १८९४.५० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे इंटेल कंपनीला जिओमध्ये ०.३९ टक्क्यांची हिस्सेदारी मिळेल. जगभरात दर्जेदार कॉम्प्युटर चिप बनवण्यासाठी इंटेल कंपनीची ओळखली जाते. या गुंतवणूकीसोबतच गेल्या दोन महिन्यांमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांकडून झालेल्या गुंतवणूकीचा आकडा ११७५८८.४५ कोटी रुपये होईल.

चांगली बातमी : भारतात कोरोनावरील दुसरी लसही विकसित

दरम्यान, जिओमध्ये सर्वात आधी फेसबुकने ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणूक करत ९.९९ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्व्हरलेकनं ५६६५.७५ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह जिओमधील १.१५ टक्के हिस्सा खरेदी केला. त्यानंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. याअंतर्गत त्यांनी कंपनीत ११३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. या पद्धतीने एकूण आतापर्यंत ११ कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. आता इंटेल कॅपिटल जिओमध्ये १८९४.५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. जिओसाठी ही मोठी बातमी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intel Capital to Invest Rs 1894.50 Crores in Jio Platforms