esakal | मुंबईत इंधन दरवाढ कायम; पेट्रोल 24, डिझेल 32 पैशांनी पुन्हा महागले | Petrol
sakal

बोलून बातमी शोधा

petrol diesel rate

मुंबईत इंधन दरवाढ कायम; पेट्रोल 24, डिझेल 32 पैशांनी पुन्हा महागले

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International market) आता इंधनाच्या कच्चा तेलाचे दर कडाडल्याने आधीच महागलेलेल्या इंधनाच्या दराला (Oil rates) पुन्हा तडका बसला आहे. मुंबईत पुन्हा एकदा इंधनाच्या दरांनी उच्चांक घेतला असून, शनिवारी पेट्रोल 24 तर डिझेल 32 पैशाने महागले आहे. त्यामुळे मुंबईकरांना शनिवारी पेट्रोल (petrol) 108.19 तर डिझेल (Diesel) 98.16 रुपये प्रति लिटर दराने विकत घ्यावे लागले आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंवर सुद्धा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या कायद्याप्रमाणे करा; वरळीत उपोषण

देशभरात होत असलेल्या इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीसाठी भारत सरकार जबाबदार आहे. दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे कोणतीही योजना नाही. त्यामुळे वेळोवेळी गॅस आणि पेट्रोल दरवाढ होत आहे. गेल्या 7 वर्षांपासून ही दरवाढ होत असून, दर सोयीस्कररित्या वाढविल्या जात आहे. त्यामधून कोटींची कर वसुली होत आहे. मात्र, हा कर कॅगच्या रिपोर्ट मध्ये कुठेही दिसत नसल्याने केंद्राच्या भूमीवर साशंकता वाटत असल्याचे अर्थतज्ज्ञ मत व्यक्त करत आहे.

गॅस निर्मितीसाठी चीन सर्वात मोठा देश असून, भारत 50 टक्के गॅस आयात करत असल्याने त्याचा परिणाम भारतावर होणार आहे. शिवाय सीएनजी आणि पीएनजीवर सुद्धा होणार आहे. मार्केट मध्ये ज्या वस्तूंची गरज आहे. त्याचे भाव वाढ होणारच आहे. या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणारे घटक आहे. त्यामुळे इंधन, सीएनजी, पीएनजीचे सुमारे 25 टक्याने वाढ होणारच आहे. मात्र, कराच्या रूपाने मिळणारे 20 लाख कोटीचे उत्पन्न केंद्राकडून दाखवल्या जात नसल्याने केंद्राची भूमिका संशयास्पद असल्याचे अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी सांगितले आहे.

loading image
go to top