दरमहा गुंतवा 1,500 रुपये, मिळतील 35 लाख; जाणून घ्या पोस्टाची भन्नाट स्कीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

post

दरमहा गुंतवा 1,500 रुपये, मिळतील 35 लाख; जाणून घ्या पोस्टाची भन्नाट स्कीम

- शिल्पा गुजर

Post Office Scheme : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यातले अनेक पर्याय अतिशय आकर्षक आणि भरघोस परतावा देणारे आहेत. पण, यात बरीच जोखीमही आहे. बरेच गुंतवणूकदार कमी परताव्यासह सुरक्षित गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात कारण ते कमी जोखमीचे असते जर तुम्हीही कमी जोखमीचे पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची नवी स्कीम तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. भारतीय पोस्टाची ग्राम सुरक्षा योजना हा असाच एक उत्तम पर्याय आहे ज्यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवू शकता. ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत, बोनससह विमा रकमेची रक्कम 80 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळेल किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास या व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला मिळते.

अटी आणि शर्थी, नियम

19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवली जाऊ शकते. या योजनेचे प्रीमियम अर्थात हप्ता पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक अशा पद्धतीने केले जाऊ शकते. प्रीमियम भरण्यासाठी ग्राहकाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. या अवधीत पैसे न भरल्यास, ग्राहकाला पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी प्रलंबित प्रीमियम भरावा लागेल.

कर्जही मिळणार

या विमा योजनेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता, पॉलिसी खरेदीच्या चार वर्षानंतर तुम्हाला या पॉलिसीवर कर्ज मिळू शकते.

पॉलिसी सरेंडर करू शकतो

ग्राहक 3 वर्षांनंतर पॉलिसी सरेंडर करु शकतो. अशा परिस्थितीत आपल्याला त्याचा कोणताही लाभ मिळणार नाही. पॉलिसीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इंडिया पोस्टाने दिलेला बोनस आहे.

परिपक्वता लाभ (Maturity Benefit)

जर कोणी 19 वर्ष वयाच्या आत 10 लाखांची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केली तर मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1,515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपयांचा परिपक्वता लाभ (Maturity Banefit) मिळेल. 60 वर्षांसाठी परिपक्वता लाभ (Maturity Banefit) 34.60 लाख रुपये असेल.

संपूर्ण माहिती कुठे मिळेल?

नाव किंवा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर यासारख्या तपशीलांमध्ये कोणतेही अपडेट असल्यास, त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता. इतर प्रश्नांसाठी, ग्राहक दिलेल्या टोल-फ्री हेल्पलाईन 1800 180 5232/155232 वर किंवा अधिकृत वेबसाइट www.postallifeinsurance.gov.in वर संपर्क साधू शकतात.

Web Title: Invest Rs 1500 Per Month Get Rs 35 Lakh Learn India Post Scheme

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top