शेअर बाजारात गुंतवणूक करताय? थोडं थांबा...

बुधवार, 22 मे 2019

पुणे: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात उत्साहाचे वातावरण संचारले होते. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारभांडवलात तब्बल 5.33 लाख कोटी रुपयांची भर पडली. 

मात्र काल पुन्हा शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे 300 आणि 100 अंशांची घसरण बघायला मिळाली. उद्या (गुरुवार) लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या देखील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी चालू आठवड्यात शेअर बाजारापासून दोन हात दूर राहणे इष्ट ठरणार आहे.

गुंतवणूकदारांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेणे अधिक योग्य ठरेल. बऱ्याच ब्रोकरकडून किंवा शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या लोकांकडून सांगितले जाते की, उद्या सर्वात मोठा दिवस असणार आहे. त्यामुळे गुंतवणुकीची संधी पुन्हा येणार नाही वगैरे. मात्र शेअर बाजारात दररोज संधी येत असतात आणि जात असतात. संयमाने आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने शेअर बाजारात गुंतवणुकीचा निर्णय घ्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Before investing in the Indian stock market, Here’s what you should know