म्युच्युअल फंड गुंतवणूक;टाळण्याजोगे काही

म्युच्युअल फंड गुंतवणूक;टाळण्याजोगे काही

आमच्या महाविद्यालयातील प्रोफेसर मेहता आम्हाला एक छोटेखानी उपदेश नेहमी देत असत. तो म्हणजे, ‘गरीब म्हणून जन्माला येणं हा आपला दोष नाही; पण गरीब राहून मरणं हा संपूर्णतः आपला दोष आहे,’ हे वाक्‍य माझ्या सामान्य बुद्धीला अजूनही अस्वस्थ करतं. कालांतराने मी गुंतवणूक क्षेत्रात काम करू लागलो. त्यानंतर माझी पुस्तकाच्या माध्यमातून वॉरन बफे, रॉबर्ट कियोसाकी, राकेश झुनझुनवाला, रामदेव अग्रवाल अशा महान व्यक्तींबरोबर ओळख झाली. मी त्यांच्याकडून एक गोष्ट शिकलो व अजूनही शंभर टक्के अमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ती म्हणजे, ज्या बाबी गुंतवणूक करताना करायच्या नाहीत, त्या बाजूला ठेवणे उत्तम असते. आज मला त्याचा खूप फायदा होतो. विशेषतः ज्या वेळेस मी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचे नियोजन करतो, तेव्हा अशी गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, याकडे लक्ष देतो. त्यापैकी पुढील प्रमुख नऊ गोष्टींचा मी येथे उल्लेख करीन. 

१) म्युच्युअल फंडात लाभांश पर्याय शक्‍यतो निवडू नये. या पर्यायात आपलेच पैसे आपणास लाभांश रूपाने मिळतात व तेही लाभांश कर वजा करून!

२) एकरकमी पैसे गुंतवताना, पाच वर्षांपेक्षा जास्त गुंतवणूक कालावधी नसेल, तर इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू नये. आपली गुंतवणूक केलेली रक्कम घटण्याची शक्‍यता असते.

३) डेट हायब्रिड फंडात गुंतवणूक करू नये. कारण या पर्यायात इतर डेट फंडांपेक्षा जास्त  व्यवस्थापन शुल्क आकारले जाते. याचा परिणाम आपल्या परताव्यावर होऊ शकतो.

४) सेक्‍टोरल वा थिमॅटिक किंवा स्मॉल कॅप फंडांमध्ये एकरकमी गुंतवणूक टाळावी. अशा फंडांमध्ये जोखीम प्रमाणाबाहेर असते.

५) इक्विटी बॅलन्स्ड फंडामध्ये गुंतवणूक केल्यापासून एक वर्षाच्या आत ‘एसडब्ल्यूपी’ हा पर्याय निवडू नये. एक वर्षाच्या आतील पर्यायामुळे निधीचे मूल्यांकन दीर्घकाळात अपेक्षेपेक्षा कमी मिळू शकते आणि एक वर्षाच्या आत अल्पकालीन भांडवली उत्पन्न कर १५ टक्के लागतो.

६) उद्दिष्टाशिवाय ‘एसआयपी’ करणे पूर्णतः टाळावे.

७) अल्पकाळासाठी गुंतवणूक करण्यासाठी बाँड फंड, इन्कम फंड, लो ड्युरेशन फंड, जी-सेक फंड टाळावेत. फक्त लिक्विड फंडांचा पर्याय निवडावा.

८) क्‍लोज एंडेड फंड, कमी गुणवत्ता दर्जा असणाऱ्या ‘एफएमपी’ यांपासून गुंतवणूक दूर ठेवावी.

९) गुंतवणूक खर्च वाचतो, या भ्रमात राहून ‘डायरेक्‍ट’ योजनांमध्ये गुंतवणूक करू नये. आर्थिक सल्लागारांची मदत घेऊन किंवा सल्ला घेऊनच योग्य ती योजना आणि  पर्याय निवडावा.

आर्थिक उन्नतीसाठी ‘सकाळ मनी’ची साथ हवीय?
म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असून, वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (आयएफए) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक उन्नती साधण्याची संधी  उपलब्ध झाली आहे. 

अल्पबचत प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी, कंपन्यांच्या एफडीचे एजंट, पिग्मी एजंट यांना म्युच्युअल फंड या गुंतवणूक प्रकारासाठी काम करण्याची आणि उत्पन्न मिळविण्याची सुवर्णसंधी आता प्राप्त झाली आहे. गुंतवणूक प्रतिनिधी होण्यासाठी ९८८१०९९२०० या क्रमांकावर, तर गुंतवणूकदारांनी ७३५०८७३५०८ या क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यावा. त्यांना नंतर संपर्क साधला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com