बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे वेळेवर संधी साधा

Investment Plans
Investment PlansSakal

दिनेश पांगटे

आज आपण अशा एका टप्प्यावर उभे आहोत जिथे इक्विटी क्षेत्राचे आशावादी चित्र आणि अनेकवार वाढलेली बाजाराची तरलता यांच्यामुळे इक्विटी (equity investment) बाजारपेठेच्या मूल्यामध्ये वाढ झाली आहे व त्यामुळे ही बाजारपेठ आर्थिक पडझडीतून सावरण्याचे अतिशय आशावादी चित्र उभे राहिले. प्रत्यक्षात स्थूल अर्थशास्त्रीय मानके याहून अतिशय वेगळे चित्र दर्शवित आहेत. भारतीय ढोबळ अर्थव्यवस्था इक्विटी मार्केटच्या (equity market) वधारलेल्या मूल्याच्या समान पातळीवर येण्यास अजून बराच अवकाश आहे. परिणामी अर्थव्यवस्थेला बसणा-या कोणत्याही फटक्यामुळे उदा. दुसरी लाट, सावरण्याची प्रक्रिया आणखी लांबू शकते व त्यामुळे इक्विटी मार्केटला करेक्शन्सच्या धोक्याला सामोरे जावे लागू शकते. दुस-या बाजूला कॅपेक्स, इन्फ्लेशन, वित्तीय तूट, निर्गुंतवणूकीच्या योजना इत्यादींच्या आघाडीवर होत असलेल्या सकारात्मक घडामोडींमुळे इक्विटी बाजाराचे मूल्य आणखी उंचीवर पोहोचू शकते. त्यामुळे अशा काळामध्ये गुंतवणूक करणे अवघड व हिकमतीचे ठरू शकते. (investment avenues Indians look at while saving for financial goals)

या दुविधेविषयी बोलण्याआधी मी गुंतवणूकीशी निगडित काही प्राथमिक मुद्दयांना स्पर्श करू इच्छितो. कोणताही हेतू किंवा लक्ष्य समोर न बाळगता गुंतवणूक करणे ही गुंतवणुकदारांकडून सर्रास होणारी चूक आहे. तेव्हा प्रत्येक गुंतवणूकदाराने सर्वप्रथम आणि प्राधान्याने आपल्या गुंतवणूकीचे उद्दीष्ट निश्चित करायला हवे. यामुळे गुंतवणुकदाराचे ध्येय स्पष्ट होते व गुंतवणूकदाराला कॅल्क्युलेटेड रिस्क घेता येते अर्थात फायदे-तोटे व्यवस्थित जोखून धोका पत्करता येतो. तेव्हा गुंतवणुकीचे उद्दीष्ट निश्चित करणे हे यशस्वी गुंतवणुकीच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल असते.

Investment Plans
फिनटेक : ई-इन्व्हॉइसिंग आणि ई-बिल प्रणाली

आता पुन्हा आपल्या प्रश्नाकडे वळायचे झाले, तर मला हा प्रश्न भारताच्या विकासाच्या दीर्घकालीन वाटचालीचा एक अविभाज्य भाग वाटतो. माझ्यासाठी या घडामोडी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गुंतवणुकीच्या संधी आहेत. भारत आपल्या समवर्तींच्या माझ्या मते समभागांच्या वाढलेल्या किंमती हा आपल्या सरकारने मोठ्या प्रमाणात हाती घेतलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांचा परिपाक आहे, ज्याचा परिणाम आपल्याला नजिकच्या भविष्यात दिसू शकेल. महामारीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारला अनेकदा आर्थिक मदत देण्यासारख्या उपाययोजना कराव्या लागल्या ज्यामुळे निर्गुंतवणुकीच्या काही आशावादी योजना, एलआयसी इंडियाच्या लिस्टिंगचा ब-याच काळापासून प्रलंबित असलेला निर्णय, पीएसयू बँकांचे पुनर्भांडवलीकरण आणि खासगीकरण यांसारख्या नियामक उपाययोजना, बँका आणि रिअल इस्टेट क्षेत्रासाठी काही नियामक चौकटींमध्ये शिथिलता आणणे, अनेक क्षेत्रांमध्ये परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) योजना लागू करणे यांसारख्या अर्थव्यवस्थेला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणा-या गोष्टी रेंगाळल्या. सरकार योग्य दिशेने पावले टाकत असल्याचे दिसत आहे.

खरेतर जीएसटीमधून मिळालेला सर्वाधिक महसूल, ऑटो सेल्सच्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात सावरणे, ट्रेड बॅलन्समध्ये झालेली सुधारणा, एसआयपींमधील गुंतवणूकीने मार्च २०२१ मध्ये गाठलेली ९२०० कोटी रुपयांची विक्रमी उंची (स्रोत: एएमएफआय https://www.amfiindia.com/) अशा घडामोडींच्या रूपात आशेचे नवे कोंब दिसूही लागले आहेत. त्यातच यंदा जवळ-जवळ अपेक्षेइतका चांगला पाऊस होईल असाही अंदाज आहे व त्यामुळे येत्या वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेच्या वेगाने पूर्ववत होण्याच्या दृष्टीने एक भरभक्कम पाया घातला जाणार आहे. या तथ्यांकडे पाहता दीर्घकालीन वाढीला कुठेही धक्का बसलेला नाही या गोष्टीचा पुरावा मिळतो. भारतीय समभागांमध्ये गुंतवणूक करणा-या गुंतवणुकदारांना म्हणूनच माझी विनंती आहे. किरकोळ गुंतवणुकदारांसाठी एसआयपींच्या माध्यमातून गुंतवणूक करणे हा इक्विटी मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. याचा एक फायदा म्हणजे त्यामुळे इक्विटी मार्केटमधील अनिश्चिततेपासून सुरक्षित राहण्यास मदत होते.

एखादी गुंतवणूक जेव्हा दीर्घकाळासाठी, जसे की ८-१० वर्षांसाठी केली जाते तेव्हाच त्यातून सर्वोत्तम परतावा मिळू शकतो असे मी मानतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना एक यशस्वी गुंतवणूदार बनायचे असेल तर त्यासाठी दूरदृष्टी आणि शिस्त आवश्यक आहे. दूरदृष्टी आणि शिस्त यांची जोड लाभलेल्या दीर्घकालीन गुंतवणूकीतून गुंतवणूकदाराला मूल्य संवृद्धीच्या माध्यमातून वित्तसंचय निर्माण करता येतो व चक्रवाढीच्या ताकदीने जास्तीत जास्त लाभ मिळवता येतो.

दीर्घकालीन गुंतवणुकीचा आणखी एक फायदा म्हणजे त्यामुळे बाजारपेठेमध्ये मोठे चढउतार होत असताना त्यात पुन:प्रवेशाच्या संधी मिळतात. गुंतवणूकदारांनी एसआयपींमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवायला हवे व हे करताना जेव्हा जेव्हा बाजारात मोठी घसरण होईल तेव्हा त्याकडे इक्विटी फंडामध्ये एकगठ्ठा गुंतवणूक करण्याची संधी म्हणून पहायला हवे. मला इथे सांगावेसे वाटते की, तुम्हाला कदाचित बाजाराचा अचूक अंदाज बांधता येणार नाही पण दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे तुम्हाला संधी मात्र अचूक वेळी साधता येईल. इक्विटी मार्केटमध्ये अलीकडेच झालेली घसरण हे याचे आदर्श उदाहरण आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करणा-यांनी बाजार कोसळलेला असताना अधिक गुंतवणूक करून अधिक फायदा पदरात पाडून घेतला असणार.

Investment Plans
'एआय'द्वारे आजाराचे अचूक निदान करणारी डीपटेक

भारतीय इक्विटी मार्केटच्या क्षमतांचा जास्तीत-जास्त उपयोग करून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एसआयपींच्या माध्यमातून विविधांगी अर्थात डायव्हर्सिफाइड फंडांमध्ये गुंतवणूक करणे. इक्विटी मार्केटमध्ये आजही तरण्याची क्षमता दिसून येत आहे. असे असले तरीही कोणते क्षेत्र इतर क्षेत्रांच्या मानाने सरस कामगिरी करून दाखवेल याचा अंदाज बांधता येत नाही. म्हणूनच आपल्या पोर्टफोलिओची लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, थिमॅटिक फंड्स इत्यादी वेगवेगळ्या फंडांमध्ये विभागणी करणे अधिक चांगले. वरील प्रकारच्या म्युच्युअल फंडांची एसआयपी घेतल्याने कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या क्षेत्रातील/कंपनीतील इक्विटींमधील गुंतवणुकीसाठी डेटा आणि तथ्यांनुसार चालणारा दृष्टीकोन आवश्यक असतो. मूलभूत गुंतवणुकीसाठी गुंतवणुकदाराला या प्रक्रियेमध्ये अधिक जास्त प्रमाणात समरस व्हावे लागते आणि म्हणूनच हे काम एखाद्या पूर्णवेळच्या नोकरी सारखेच असते.

आपल्या चालू नोकरीच्या जोडीने बाजाराचे पायाभूत संशोधन करणे ही कोणत्याही किरकोळ गुंतवणूकदारासाठी जवळ-जवळ अशक्यप्राय गोष्ट ठरते. इथेच म्युच्युअल फंडांची भूमिका महत्त्वाची ठरते. म्युच्युअल फंडांकडे फंड मॅनेजर्सच्या रूपात खास याच कामासाठी वाहिलेले मनुष्यबळ तैनात असते. ही मंडळी गुंतवणूकदारांच्या पैशांचे सक्रियपणे व्यवस्थापन करतात. त्याचबरोबर या फंडांकडे तयारीचे विश्लेषक असतात. विविध क्षेत्रांच्या कामगिरीचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याकडे असतो व ते सातत्याने गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेत असतात. गुंतवणुकीच्या तत्त्वांचे पाठबळ लाभलेले, बहुस्तरीय मूल्यमापन प्रक्रियेच्या माध्यमातून सातत्याने देखरेखीखाली असलेले कठोर पायाभूत विश्लेषण म्युच्युअल फंडांकडून केले जात असते, ज्यामुळे ते मार्केटमधील संधी व धोके तत्परतेने ओळखतात आणि आवश्यक ती पावले उचलतात. म्युच्युअल फंड्स अनेक दशकांपासून कार्यरत आहेत व त्यामुळे किरकोळ बाजार भारताचा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांनी समभागांच्या क्षमतांवर विश्वास ठेवून म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून त्यांत गुंतवणूक करावी अशी माझी विनंती आहे. (investment avenues Indians look at while saving for financial goals)

याशिवाय किरकोळ गुंतवणूकदारांना गुंतवणुकविषयक थोडक्यात सांगायचे तर, दीर्घकालीन उद्दीष्ट समोर ठेवून गुंतवणूक करणा-या गुंतवणूकदारांना माझी अशी विनंती आहे की, त्यांनी विविध फंडांच्या एसआयपींमध्ये केलेलल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून एक शिस्तबद्ध गुंतवणूक योजना तयार करावा व चक्रवाढीच्या ताकदीचा अधिकाधिक वापर करून एका मोठ्या रकमेचा संचय करावा. दरम्यान गुंतवणूकदारांनी बाजाराची पडझड आणि सुधारणा यांच्याकडेही बाजाराता पुनप्रवेश करण्याची संधी म्हणूनच पाहिले पाहिजे. अनुभव असल्याशिवाय स्टॉक मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करणे टाळावे. म्युच्युअल फंडांच्या तज्ज्ञत्वावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवावा. आपल्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी शक्यतो आर्थिक तज्ज्ञंची मदत घ्यावी.

सुनिश्चित हेतू बाळगून गुंतवणूक करणे, दीर्घकालीन गुंतवणुकीशी एकनिष्ठ राहणे आणि गुंतवणुकीसाठी योग्य मार्ग निवडणे हे आर्थिक स्वावलंबित्व मिळविण्याच्या दिशेने केलेल्या वाटाचालीतील मैलाचे टप्पे आहेत.

(लेखक हे एलआयसी म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट लिमिटेडचे (LICMF AMC) सीईओ आहेत)

अस्वीकृती: या अस्वीकृतीद्वारे आम्ही वाचकांना माहीत करून देऊ इच्छितो की या लेखामध्ये व्यक्त करण्यात आलेले दृष्टीकोन, विचार आणि मते हे संपूर्णपणे लेखकाचे आहेत व लेखकाची मालक कंपनी, संस्था, समिती किंवा इतर कोणत्याही गटाच्या वा व्यक्तीच्या मताचा त्यांच्याशी संबंध असेलच असे नाही. म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीमध्ये बाजारपेठेतील धोक्यांचा संभव असतो, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com