नामवंतांकडून गुंतवणुकीचे मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Famous

नामवंतांकडून गुंतवणुकीचे मार्गदर्शन

गेल्या तीन-चार वर्षांत म्युच्युअल फंडांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या योजनांकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) घराघरांत पोचला. दरमहा ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक या मार्गातून होऊ लागली.

दीर्घ मुदतीसाठी बाजारात गुंतवणूक करण्याचा हा योग्य मार्ग अनेकांनी अंगीकारला. महागाई दरावर मात करून ‘खऱ्या अर्थाने परतावा’ मिळवायचा असेल तर इक्विटी या ॲसेट क्‍लासची कास धरणे गरजेचे ठरत आहे आणि याची जाणीव हळूहळू गुंतवणूकदारांना होऊ लागली आहे. त्याचेच प्रतिबिंब म्युच्युअल फंडांकडे वाढत चाललेल्या गुंतवणुकीच्या आकड्यांतून दिसून येत आहे. यानिमित्ताने पारंपरिक गुंतवणूक प्रकारांकडून काहीशा नव्या गुंतवणूक प्रकाराकडे नागरिकांचा कल वाढत चालल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.

‘सकाळ मनी’चा प्रभावी उपक्रम
बदलत्या काळाची नेमकी हीच गरज ओळखून, सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आर्थिक समृद्धीसाठी एक चांगला गुंतवणूक प्रकार प्रभावीपणे सादर करण्याचे ‘सकाळ मनी’ने ठरविले आहे. याचे पहिले पाऊल म्हणून (www.sakalmoney.com) या नव्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाचे पुढील पाऊल म्हणून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात थेट नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ‘सकाळ मनी’ने जनजागृतीपर सेमिनार घेण्यास सुरवात केली आहे. आता एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या सहकार्याने पुण्यात येत्या २६ ऑक्‍टोबरला, तर कोल्हापूर व नाशिकमध्ये २ नोव्हेंबरला खास सेमिनारचे आयोजन केले जात आहे.

पुण्यातील सेमिनार
वार व तारीख - शुक्रवार, २६ ऑक्‍टोबर २०१८
वेळ - सायंकाळी ५ वाजता 
स्थळ - गणेश कला क्रीडा मंच, नेहरू स्टेडियमजवळ, स्वारगेट, पुणे
प्रमुख वक्ते - प्रशांत जैन (कार्यकारी संचालक व मुख्य गुंतवणूक अधिकारी, एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी)

प्रशांत जैन यांना गुंतवणूक व्यवस्थापनाचा २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. म्युच्युअल फंड क्षेत्रातील प्रख्यात आणि नावाजलेले मान्यवर म्हणून त्यांना सर्व जण ओळखतात. ते स्वत: इक्विटी प्रकारातील तीन योजनांचे फंड मॅनेजर आहेत. एखाद्या फंडाचे व्यवस्थापन २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी करीत त्यात १९ टक्के वार्षिक वृद्धिदराने परतावा मिळवून देण्याची त्यांची क्षमता वाखाणण्यासारखी आहे. ते बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (आयआयएम) पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्याआधी त्यांनी कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतून (आयआयटी) मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतलेली आहे. १९९१ ते ९३ या कालावधीत ते एसबीआय म्युच्युअल फंड; तसेच १९९३ ते २००३ दरम्यान झ्युरिच म्युच्युअल फंडात कार्यरत होते. २००३ मध्ये झ्युरिच म्युच्युअल फंडाचे संपादन एचडीएफसी म्युच्युअल फंडाने केल्यापासून ते एचडीएफसी म्युच्युअल फंडात कार्यरत आहेत.
नावनोंदणीसाठी मिस्ड कॉल द्या - ७४४७४५०१२३

नाशिकमधील सेमिनार
वार व तारीख - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१८
वेळ - सायंकाळी ५ वाजता 
स्थळ - हॉटेल दि एसएसके सॉलिटेअर, अहिल्याबाई होळकर मार्ग, चांडक सर्कलच्या शेजारी, तिडके कॉलनी, नाशिक
प्रमुख वक्‍त्या - श्‍यामली बसू (वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य- प्रॉडक्‍ट्‌स आणि मार्केटिंग, एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी)

श्‍यामली बसू यांना विक्री, वितरण, इक्विटीतील संशोधन आणि मालमत्ता सल्लागार या क्षेत्रातील एकत्रितरित्या २२ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. श्‍यामली या दिल्ली विद्यापीठातून वित्त (फायनान्स) या विषयातून एमबीए झालेल्या आहेत. एचडीएफसी म्युच्युअल फंडात त्या २००१ पासून कार्यरत आहेत. सध्याच्या पदाआधी त्या एचडीएफसी म्युच्युअल फंडात वरिष्ठ उपाध्यक्षा आणि पूर्व विभागाच्या प्रमुखसुद्धा होत्या.
नावनोंदणीसाठी मिस्ड कॉल द्या - ७४४७४५२३३२

कोल्हापूरमधील सेमिनार
वार व तारीख - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१८
वेळ - सायंकाळी ५ वाजता 
स्थळ - इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, शाहू मिल रस्ता, ८ वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर
प्रमुख वक्ते - अशोक कानावाला (उपाध्यक्ष- प्रॉडक्‍ट्‌स आणि बिझनेस डेव्हलपमेंट, एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी) 

अशोक कानावाला यांना म्युच्युअल फंड व्यवसायाचा २० हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. ते चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट आणि एलएलबी पदवीधर आहेत. एचडीएफसी म्युच्युअल फंडात ते एक दशकापासून कार्यरत आहेत. या दरम्यान त्यांनी एचडीएफसी म्युच्युअल फंडात ऑपरेशन्स, ग्राहक सेवा, विक्री या विभागांत काम केले आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाआधी ते बॅंक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडात फंड मॅनेजर म्हणून १० वर्षे कार्यरत होते.
नावनोंदणीसाठी मिस्ड कॉल द्या - ७४४७४५२३३८

प्रवेश विनामूल्य, पण नावनोंदणी आवश्‍यक
सर्व सेमिनार सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, त्याला उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्यांना संबंधित दूरध्वनी क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन लिंक असणारा ‘एसएमएस’ पाठविला जाणार आहे. त्या लिंकवर ‘क्‍लिक’ केल्यानंतर आपली माहिती भरून ती ‘सबमिट’ करावी लागणार आहे. त्यानंतर येणारा ‘ओटीपी’ टाकल्यावर सेमिनारसाठीचे रजिस्ट्रेशन झाल्याचा नंबर मिळणार आहे. हा नंबर सेमिनारस्थळी दाखविल्यानंतरच नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य’ या तत्त्वावर हा प्रवेश दिला जाणार आहे.

आसनसंख्या मर्यादित असल्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ सर्वसामान्य नागरिकांबरोबरच इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्सनी (आयएफए) घ्यावा आणि त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. या सेमिनारसाठी नावनोंदणी करून प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या नागरिकांना म्युच्युअल फंडाविषयी सविस्तर माहिती देणारे पुस्तक ‘सकाळ मनी’च्या सल्लागारांकडून नंतर स्वतंत्रपणे भेटून दिले जाणार आहे.

Web Title: Investment Guidelines Famous People

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top