IDBI म्युच्युअल फंड्सच्या तीन स्कीम्स, पैसे पाच वर्षात होतील दुप्पट

आयडीबीआय म्युच्युअल फंड तीन योजनांमधून गुंतवणूकदारांचे पैसे 5 वर्षांत दुप्पट झाले आहेत
IDBI mutual funds
IDBI mutual fundsesakal
Summary

आयडीबीआय म्युच्युअल फंड हाऊसच्या काही योजनांमध्ये गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे मिळालेत. खास गोष्ट अशी आहे की तुम्ही किमान 500 मासिक SIP सह गुंतवणूक सुरू करू शकता.

देशात अनेक मोठ्या बँका म्युच्युअल फंड व्यवसायात आहेत. यात आयडीबीआय बँकेचाही समावेश आहे. आयडीबीआय म्युच्युअल फंड ही बँकेची उपकंपनी आहे. आयडीबीआय म्युच्युअल फंडाद्वारे अनेक योजना चालवल्या जात आहेत. याच स्कीम्समधून 5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झालेत. अशा 3 योजनांची माहिती आम्ही इथे दिली आहे.

आयडीबीआय निफ्टी इंडेक्स फंड (IDBI Nifty Index Fund)

आयडीबीआय निफ्टी इंडेक्स फंडाने पाच वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या योजनेतून16.45 टक्के वार्षिक परतावा मिळाला. यामध्ये 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 2.14 लाख रुपये झाली आहे. त्याच वेळी, 10,000 रुपयांच्या मासिक SIP चे मूल्य 10.04 लाख रुपये झाले आहे. या योजनेत, किमान एकरकमी 5,000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते, तर किमान 500 रुपयांची SIP केली जाऊ शकते. 30 सप्टेंबर 2021 रोजी या फंडचा एसेट 220 कोटी रुपये होती आणि 31 ऑगस्ट 2021 रोजी एक्सपेंस रेश्यो 0.16 टक्के होता. ही योजना 1 जानेवारी 2013 रोजी लाँच करण्यात आली आहे.

IDBI mutual funds
शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात ‘या’ घटकांवर ट्रेडर्सचं लक्ष

आयडीबीआय इंडिया टॉप 100 इक्विटी फंड (IDBI India Top 100 Equity Fund)

आयडीबीआय इंडिया टॉप 100 इक्विटी फंडाने 5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या योजनेतून 15.96 टक्के वार्षिक परतावा मिळाला. यामध्ये 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 2.10 लाख रुपये झाली आहे. त्याचबरोबर 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीचे मूल्य वाढून 10.40 लाख झाले आहे. या योजनेत, किमान एकरकमी 5,000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते, तर किमान 500 रुपयांची SIP केली जाऊ शकते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत याचा फंड एसेट 547 कोटी रुपये होता. तर 31 ऑगस्ट 2021 पर्यंत एक्सपेंस रेश्यो 1.34 टक्के होता. ही योजना 1 जानेवारी 2013 रोजी लाँच करण्यात आली आहे.

IDBI mutual funds
बाजार मंदीत असताना या शेअर्सची करा खरेदी; तज्ज्ञांचा सल्ला

आयडीबीआय फ्लेक्सी कॅप फंड (IDBI Flexi Cap Fund)

आयडीबीआय फ्लेक्सी कॅप फंडानेही 5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. योजनेतून 15.94 टक्के वार्षिक परतावा मिळाला. यामध्ये 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 2.09 लाख रुपये झाली आहे. त्याच वेळी 10,000 रुपयांच्या मासिक SIP चे मूल्य 10.41 लाख रुपये झाले आहे. या योजनेत, किमान एकरकमी 5,000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते, तर किमान 500 रुपयांची SIP केली जाऊ शकते. 30 सप्टेंबर 2021 रोजी फंड एसेट 379 कोटी रुपये होता आणि 31 ऑगस्ट 2021 रोजी एक्सपेंस रेश्यो 1.17 टक्के होते. 28 मार्च 2014 रोजी ही योजना लाँच करण्यात आली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com