(Video) "आयआरसीटीसी'चा  आयपीओ कसा आहे? 

टीम ईसकाळ
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

1) "आयआरसीटीसी'च्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे? 
- इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान बाजारात होत आहे. 645 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर रु. 315-320 असा किंमतपट्टा ठरविण्यात आला आहे. छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी प्रतिशेअर रु. 10 ची सवलत देण्यात येणार आहे. किमान 40 व पुढे 40 शेअरच्या पटीत अर्ज करता येणार आहे. 14 ऑक्‍टोबर रोजी सेकंडरी बाजारात या शेअरची नोंदणी अपेक्षित आहे. 

1) "आयआरसीटीसी'च्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे? 
- इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान बाजारात होत आहे. 645 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर रु. 315-320 असा किंमतपट्टा ठरविण्यात आला आहे. छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी प्रतिशेअर रु. 10 ची सवलत देण्यात येणार आहे. किमान 40 व पुढे 40 शेअरच्या पटीत अर्ज करता येणार आहे. 14 ऑक्‍टोबर रोजी सेकंडरी बाजारात या शेअरची नोंदणी अपेक्षित आहे. 

2) या कंपनीची प्राथमिक माहिती व व्यवसायाचे स्वरूप कसे आहे? 
- ही केंद्र सरकारची कंपनी असून, रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित हिचे कामकाज चालते. 2008 पासून तिला मिनिरत्न (पहिल्या श्रेणीतील सरकारी कंपनी) हा सन्मान देण्यात आला आहे. रेल्वेमध्ये दिली जाणारी आदरातिथ्यसेवा (हॉस्पिटॅलिटी) अधिक उच्चस्तराची असावी, यादृष्टीने कंपनीची स्थापना करण्यात आली. रेल्वेमधील खान-पान सेवा, ऑनलाइन तिकीट बुकिंग, रेल्वे व रेल्वे स्थानकावर पिशवीबंद पाणी (रेल नीर) पुरविणे या सेवा पुरविण्याचा अधिकार फक्त या कंपनीला दिलेला आहे. कंपनीचे www.irctc.co.in. हे संकेतस्थळ आशिया खंडातील सर्वांत व्यग्र असणाऱ्या संकेतस्थळांपैकी एक आहे. मुख्य व्यवसायाव्यतिरिक्त ई-केटरिंग, प्रवास व पर्यटन, बजेट हॉटेल अशा पूरक क्षेत्रांमध्ये ही कंपनी आपला व्यवसाय विस्तारत आहे. 

आयपीओबद्दल माहिती देत आहेत "सेबी' नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार नंदिनी वैद्य

3) "आयआरसीटीसी'ची आर्थिक कामगिरी कशी आहे? 
- या कंपनीची मागील तीन वर्षांमधील आर्थिक कामगिरी (कोटींमध्ये) पुढीलप्रमाणे आहे. विक्रीमध्ये 10.49 टक्के वाढ झाली आहे; तर निव्वळ नफा 14 टक्के "सीएजीआर'ने वाढला आहे. मागील तीन वर्षांतील साधारण प्रतिशेअर नफा रु. 15.5 आहे; तर रिटर्न ऑन नेटवर्थ 25.63 टक्के आहे. 

तपशील 31 मार्च 19   31 मार्च 18   31 मार्च 17 
--------------------------------------------------------------- 
मालमत्ता 2583.7         2319.1       1826.4 
विक्री      1956.6        1569.6        1602.8 
नफा         272.5         220.6           229.0 
---------------------------------------------------------------------- 

4) छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी हा "आयपीओ' कसा आहे? 
- रु. 320 ही किंमत धरली असता पीई रेशो 18.5 येतो. रेल्वेच्या अखत्यारित काम करीत असल्यामुळे एकाधिकार किंवा मक्तेदारी असल्यासारखी कंपनीची स्थिती आहे. इतर कंपन्यांना येथे प्रवेश मिळविणे अवघड आहे. दरवर्षी व्यवसायातून साधारणपणे रु. 600 कोटींवर रोकड निर्माण होते; तसेच सातत्याने लाभांश देण्याकडे कंपनीचा कल दिसतो, जो छोट्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरेल. या सर्व बाबी व छोट्या गुंतवणूकदारांसाठी दिलेली प्रतिशेअर रु. 10 ची सवलत बघता, नोंदणी व दीर्घ कालावधीच्या दृष्टिकोनातून या "आयपीओ'ला अर्ज करण्यास हरकत नाही. 

(डिस्क्‍लेमर ः शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर किंवा तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IRCTC Initial Public Offer Subscribed More Than Three Times On Day 2