esakal | कोरोना काळात पॉलिसीचा प्रीमियम चुकवू नका रे...! 
sakal

बोलून बातमी शोधा

lic-premium

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय ) विशेष सवलत म्हणून विमेदाराना प्रिमियम भरण्यासाठीचा ग्रेस पिरियड 31 मेपर्यंत वाढवून दिला आहे.त्यावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.

कोरोना काळात पॉलिसीचा प्रीमियम चुकवू नका रे...! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लॉकडाऊनमुळे सारे जनजीवन ठप्प झाले आहे. बरेच आर्थिक व्यवहार थांबल्याने बॅंकेतून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा हप्ता कसा जमा करणार?, विविध प्रकारचे कर कसे भरणार? आयुर्विमा पॉलिसीचा प्रिमियम कसा भरणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र सरकारने विविध सवलती जाहीर करत दिला दिला. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय ) विशेष सवलत म्हणून विमेदाराना प्रिमियम भरण्यासाठीचा ग्रेस पिरियड 31 मेपर्यंत वाढवून दिला आहे. त्यानुसार ज्यांचा प्रिमियम मार्चमध्ये वा त्यानंतर देय झाला आहे असे विमेदार प्रिमियम 31 मे पर्यंत भरू शकतात. त्यावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विमेदारांनी याची नोंद घेऊन आपले प्रिमियम 31 मे पूर्वी जरूर भरावेत. मात्र ग्रेस पिरियड संपण्यापूर्वी प्रिमियम भरला गेला नाही तर पॉलिसी लॅप्स होते, म्हणजे बंद पडते आणि त्यातून विमेदाराचे नुकसान होण्याची शक्‍यता असते. 

आणखी बातम्या व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिमियमची देय तारीख आणि ग्रेस पिरियडविषयी 

पॉलिसी दस्तावेजात सुरवातीलाच हे स्पष्ट केले जाते की, करारात ठरल्याप्रमाणे प्रिमियम भरले गेले तरच क्‍लेमचे फायदे मिळू शकतील. याचाच दुसरा अर्थ असा की प्रिमियम भरला नाही तर क्‍लेम मिळू शकणार नाही. 

प्रिमियम केव्हा देय होईल हेही पॉलिसी मध्ये स्पष्ट केलेले असते. समजा, पॉलिसी करार सुरू झाल्याची तारीख 5 एप्रिल असेल आणि प्रिमियम भरण्याची निवडलेली पद्धत वार्षिक असेल तर दरवर्षी 5 एप्रिल रोजीच प्रिमियम देय होईल.सहामाही पद्धत असेल तर दरवर्षी 5 एप्रिल आणि 5 ऑक्‍टोबर रोजी देय होईल. तिमाही असेल तर 5 जानेवारी, 5 एप्रिल, 5 जुलै, 5 ऑक्‍टोबर अशा देय तारखा येतील. 

प्रिमियम देय झाल्या बरोबर किंवा दोन दिवस आधीच भरला तर उत्तमच आहे. पण करारातील तरतुदीनुसार त्यासाठी देय तारखेपासून पुढे 30 दिवसांची मुदत (ग्रेस पिरियड) असते. या काळात केव्हाही प्रिमियम भरता येतो. मासिक पद्धतीत हा ग्रेस पिरियड 15 दिवसांचा असतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ग्रेस पिरियड मध्ये केव्हाही प्रिमियम भरला तरी (अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा) त्यावर दंड/ व्याज आकारले जात नाही. ग्रेस पिरियडच्या शेवटच्या दिवशी जर कार्यालय सुटीमुळे बंद असेल तर त्याच्या पुढच्या दिवशी प्रिमियम भरता येतो. 

देय झालेला प्रिमियम भरलेला नसताना ग्रेस पिरियड च्या काळातच विमेदाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास ती पॉलिसी चालू अवस्थेत आहे असे समजून पूर्ण क्‍लेम दिला जातो. फक्त देय झालेल्या आणि न भरलेल्या प्रिमियम ची रक्कम क्‍लेम मधून वजा केली जाते. 


ग्रेस पिरियड मध्ये प्रिमियम न भरल्यास 
ग्रेस पिरियड संपण्याच्या आत प्रिमियम भरला गेला नाही तर मात्र पॉलिसी 'लॅप्स' होते आणि मिळणारे फायदे बंद होतात. पॉलिसी अशी बंद स्थितीत असताना विमेदाराचा मृत्यू झाला तर क्‍लेम मिळू शकणार नाही. 

उदाहरणार्थ: विमेदाराने रु.50 हजार इतका पहिला वार्षिक प्रिमियम भरून 14 सप्टेंबर 2018 रोजी मनी बॅक पॉलिसी सुरू केली. पुढचा 14 सप्टेंबर 2019 चा प्रिमियम मात्र 14 ऑक्‍टोबर 2019 पर्यंत (ग्रेस पिरियड मध्ये) भरणे राहून गेले. साहजिकच 15 ऑक्‍टोबर रोजी पॉलिसी बंद (लॅप्स) स्थितीत गेली, आणि समजा दुर्दैवाने त्याच दिवशी म्हणजे 15 ऑक्‍टोबर 2019 रोजी त्याचे अपघाती निधन झाले. आता पॉलिसी लॅप्स असल्यामुळे या पॉलिसी अंतर्गत क्‍लेम मिळू शकणार नाही. इतकेच नव्हे तर भरलेल्या रु. 50 हजार प्रिमियम पैकी कोणतीही रक्कम परत मिळू शकणार नाही. 

बंद पॉलिसीचे पुनरुज्जीवन 
समजा, ग्रेस पिरियड मध्ये प्रिमियम न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स झालीय, पण विमेदार हयात असून त्याला ती पॉलिसी आता काही काळानंतर चालू करायची आहे, तर करता येईल का? होय, करता येईल. याला पॉलिसीचे पुनरुज्जीवन (रिव्हायवल) म्हणतात. करारातील नियमानुसार पॉलिसी बंद पडल्यापासून वर्षाच्या काळात पुन्हा चालू करता येते. त्यासाठी न भरलेले सर्व प्रिमियम देय तारखेपासूनच्या व्याजासह भरावे लागतीलच पण त्याच बरोबर विमेदाराचे चांगल्या प्रकृतीबद्दलचे प्रतिज्ञापत्र, मेडिकल रिपोर्ट अशी काही कागदपत्रे लागू शकतात. 

टर्म इन्शुरन्स पॉलिसी बाबत 
टर्म इन्शुरन्स पॉलिसी मध्ये ग्रेस पिरियड कमी म्हणजे 15 दिवसाचाच असू शकतो. तसेच पेड अप किंमत, क्‍लेम कन्सेशन या सुविधा या पॉलिसीत उपलब्ध नसतात. त्यामुळे या पॉलिसीचे प्रिमियम भरण्यात मुळीच चालढकल करू नये.

loading image
go to top