कर्ज देण्याचा चायनीज पॅटर्न; अवघ्या 3 मिनिटांत कर्ज

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

शांघाय: ‘पैसा फक्त आपल्यासाठीच नाही तर समाजासाठीही उपयुक्त ठरला पाहिजे,’ असा आदर्शवादी विचार घेऊन जॅक मा यांनी MYBank च्या माध्यमातून आतापर्यंत  21 हजार अब्ज रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. चीनमधील अग्रगण्य ई- कॉमर्स कंपनी असलेल्या अलिबाबाबरोबर चार वर्षांपूर्वी मा यांनी MYBank या पेमेंट बँकेची स्थापना केली आहे.  MYBank या पेमेंट बँकेने चीनमध्ये 290 बिलियन डॉलर म्हणजेच 21000 अब्ज रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. जॅक मा यांनी 1.6 कोटी लहान कंपन्यांना कर्जाचे वाटप केले आहे. 

जॅक मा यांच्या तीन मिनिटांत कर्ज या योजनेने चीनच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले. जॅक मा यांची कर्ज वाटपाची पद्धत युनिक आहे. कर्जासाठीची संपूर्ण प्रॉसेस ऑनलाईन असून कर्ज घेण्यासाठी कोणालाही बँकेत यावे लागत नाही. कर्जाच्या ऑनलाईन पद्धतीतून 'लोन प्रोसेस' केल्यानंतर ते बँकेकडून मंजूर झाल्यास तीन मिनिटांत कर्जाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा होते. म्हणजेच व्यापारांना आणि व्यावसायिकांना कर्ज मिळाल्यानंतर लगेच तो व्यक्ती किंवा संस्था व्यवसायाला सुरुवात करू शकतो. 

भारतीय अर्थव्यवस्थेला सध्या ब्रेक लागल्याचे चित्र आहे. मात्र चीनी अर्थव्यवस्थेकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. चीनमधील जॅक मा यांच्या या  मॉडेलमुळे चीन जगातील सर्वात मोठा निर्यातक देश ठरला आहे. जॅक यांच्या बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर ते कर्ज न चुकते करण्याचा म्हणजे बुडीत कर्जाचा दर फक्त एक टक्का आहे. कर्जाचे वाटप करतानाच बँकेला ग्राहकाची संपूर्ण माहिती असते. शिवाय ग्राहकाचे उत्पादन कोणते आहे? शिवाय त्याला किती बाजारपेठ आहे हे सर्व बँकेला आधीच माहिती असते. 

चीनच्या अर्थव्यवस्थेत लहान कंपन्यांचे मोठे योगदान 
चीनच्या अर्थव्यवस्थेत  60 टक्के योगदान लहान कंपन्यांचे आहे. शिवाय 80 टक्के रोजगार या लहान उद्योगांकडून निर्माण होतो. तेथील एका सरकारी अहवालात देखील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 'जॅक मा' यांच्या बँकेचे मॉडेलच्या स्वीकार करण्यास सांगण्यात आला आहे. लहान उद्योजगांना अधिक लवकर कर्ज देण्यावर भर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. एमएसएमई आणि एसएमईमुळे चीनी अर्थव्यवस्था आज वेगात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jack Ma’s 3-minute loans are changing China’s banking