Jan-Dhan Yojana | SBI च्या 'या' ग्राहकांना लाखोंचा फायदा... जाणून घ्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Watch on large cash transactions

SBI च्या 'या' ग्राहकांना लाखोंचा फायदा... जाणून घ्या!

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सध्या SBI आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत देत आहे. एसबीआयची ही सुविधा जन-धन खात्याच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे. रुपे डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना SBI दोन लाख रुपयांपर्यंतचे मोफत अपघाती विमा संरक्षण पुरवणार आहे.

रुपे डेबिट कार्ड वापरणाऱ्यांना मृत्यू विमा, खरेदी संरक्षण कवच आणि इतर फायदे मिळतात. जन-धन खातेधारक मोफत विम्याचा लाभ घेऊ शकतात.

कसा कराल क्लेम?

या योजनेअंतर्गत पर्सनल अॅक्सिडेंड पॉलिसीनुसार भारताबाहेर घडलेल्या घटनांचाही समावेश होतो. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर विम्याच्या रकमेनुसार क्लेमची रक्कम भारतीय चलनानुसार होते. न्यायालयाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारसाच्या खात्यात ही रक्कम जमा करता येते.

हस्तांतरित करण्याचा पर्याय

तुमचं अन्य कोणतंही खातं जन-धन योजना खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय देखील आहे. ज्यांच्याकडे जन-धन खाती आहेत, त्यांना बँकेकडून रुपे पीएमजेडीवाय कार्ड मिळते. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जन-धन खात्यांवर जारी केलेल्या RuPay PMJDY कार्डांसाठी विम्याची रक्कम 1 लाख रुपये असेल. 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी केलेल्या RuPay कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती कव्हर बेनिफिट मिळेल.

2014 मध्ये सुरू झाली योजना

प्रधानमंत्री जन-धन योजना 2014 मध्ये सुरू झाली होती. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाती, क्रेडिट, विमा, पेन्शनमध्ये परवडणाऱ्या पद्धतीने फायदे देते. कोणतीही व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने खातं उघडू शकते. तसेच केवायसी(KYC) केल्यास हे खातं त्वरित अॅक्टिव्ह होतं.

टॅग्स :Narendra Modi