बँक खात्यात रक्कम नसतानाही काढू शकता १० हजार रुपये; पाहा काय आहे ही योजना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jan dhan yojana

बँक खात्यात रक्कम नसतानाही काढू शकता १० हजार रुपये; पाहा काय आहे ही योजना...

मुंबई : सध्या सरकार अनेक योजना राबवत आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी सरकारने प्रधानमंत्री जन धन खाते योजनेंतर्गत खाती उघडली होती. पीएम जन धन योजनेअंतर्गत, सरकार खात्यात रोख रक्कम नसली तरीही १० हजार रुपये काढण्याची सुविधा देते. म्हणजेच तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही १० हजार रुपयांपर्यंतची रोकड काढू शकता. तुम्ही हे खाते कसे उघडू शकता आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त पीएम जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत सुमारे ४२ कोटी खाती उघडण्यात आली आहेत. त्याचे यश पाहून, सरकारने २०१८ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती अधिक वैशिष्ट्यांसह लॉन्च केली.

आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री जन धन योजनेसाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी कागदपत्रे असली पाहिजेत. तुमच्याकडे कागदपत्रे नसल्यास, तुम्ही छोटे खाते उघडू शकता. यामध्ये बँक अधिकाऱ्यासमोर स्वत:चे साक्षांकित छायाचित्र व स्वाक्षरी द्यावी लागेल. जन धन खाते उघडण्यासाठी पैशांची गरज नाही.

जन धन खाते असे उघडा :

जन धन खाते उघडण्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत जावे लागेल.

येथे तुम्हाला PMJDY खाते उघडण्यासाठी एक फॉर्म मिळेल.

या फॉर्ममध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, बँकेच्या शाखेचे नाव, नॉमिनी, व्यवसाय किंवा नोकरी इत्यादी भरा.

फॉर्म भरल्यानंतर, सर्व महत्वाची कागदपत्रे संलग्न करा आणि बँकेत जमा करा.

यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर जन धन खाते उघडले जाईल.

जन धन खात्यात अनेक सुविधा उपलब्ध आहेत :

तुम्ही १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी जन धन खाते उघडू शकता.

यामध्ये तुम्हाला एटीएम कार्ड, २ लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, ३० हजार रुपयांचा जीवन विमा आणि ठेव रकमेवर व्याज मिळते.

यामध्ये तुम्हाला १० हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाईल.

तुम्ही ते कोणत्याही बँकेत उघडू शकता.

या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही.

जन धन खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याजाची सुविधा मिळते. यासोबतच मोफत मोबाईल बँकिंगचाही लाभ मिळणार आहे.

जर तुम्हाला जन धन खात्यातील शिल्लक तपासायची असेल तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमची बँक शिल्लक देखील तपासू शकता. तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये PMJDY खाते असल्यास तुम्ही 8004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता.

Web Title: Jan Dhan Yojana You Can Withdraw 10 Thousand Rupees Even If There Is No Cash In Account

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bank account
go to top