जेफ बेझॉस आहेत चार लाख एकर जमिनीचे मालक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

वॉशिंग्टन" आमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबाबत मी लोकांना माहिती देऊ इच्छितो असे सांगत जेफ बेझॉस यांनी पत्नीला घटस्फोट देत असल्याची माहिती ट्विटद्वारे देताच चर्चाना उधाण आले आहे. कारण, घटस्फोटानंतर जेफ बेझॉस यांच्या पत्नीला मिळणारी संपत्ती. सेलेब्रिटी किंवा मोठ्या उद्योजकाचा घटस्फोट हा काही नवीन विषय नाही. मात्र हा घटस्फोट आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा. 

जेफ बेझॉस हे अ‍ॅमेझॉन या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन स्टोअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ब्लूबर्गच्या माहितीनुसार जेफ बेझॉस यांच्याकडे एकूण 137 बिलियन डॉलर (तब्बल 10 हजार अब्ज) इतकी संपत्ती आहे. त्यात 80 मिलियन शेअर्सचा वाटा आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राची मालकी सुद्धा बेझॉस यांच्याकडे आहे. या जोडप्याकडे 4 लाख एकरची मालमत्ता आहे. 

बेझॉस यांची संपत्ती इतकी अफाट आहे की ते तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेतच परंतु जर घटस्फोटानंतर प्रॉपर्टीचे सामान वाटप करून त्यांच्या पत्नीला निम्मा वाट मिळाला (69 बिलियन डॉलर) तर त्यांची पत्नी जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरु शकतात. मात्र, त्याच बरोबर बेझोस यांचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान धोक्यात येऊन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात. त्यांच्याकडे सध्या 92.5 बिलियन डॉलरची संपत्ती आहे.

बेझॉस यांना चार मुले आहेत. 25 वर्षांच्या संसारानंतर बेझोस घटस्फोट घेणार आहेत. 54 वर्षीय जेफ बेझॉस लॉरेन सांचेझच्या (49) प्रेमात पडले आहेत. लॉरेन माजी न्यूज अँकर आणि हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून ओळख आहे. 

Web Title: The Jeff Bezos divorce: $136 billion and Amazon in the middle