रिलायन्स जिओ करणार नवीन धमाका

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 12 ऑगस्टला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओच्या गिगाफायबरच्या लॉंचची घोषणा मुकेश अंबानी यावेळी करण्याची शक्यता आहे. जिओ गिगाफायबर सेवेमुळे भारतातील घरगुती ब्रॉडबॅंड, मनोरंजन आणि स्मार्ट होम इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या ब्रॉडबॅंडच्या बाजारपेठेत मोठीच घडामोड आणि बदल घडून येणार आहेत. एका इंग्रजी संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती आली आहे. 

मागील आठवड्यात रिलायन्सचे तिमाही निकाल जाहीर करताना मुकेश अंबानी यांनी जिओ गिगाफायबर सेवांच्या बीटा चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची आणि स्मार्ट होम सोल्युशन्सचे संपूर्ण पॅकेज 5 कोटी घरांपर्यत पोचवण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले होते. त्यामुळे गिगाफायबरच्या लॉंचच्या संदर्भातील चर्चांना उधाण आले आहे. देशात अजूनही वायरलेस नेटवर्क अनेक ठिकाणी पोचले नसून जिओ गिगाफायबरच्या माध्यमातून 5 कोटी घरांपर्यत पोचता येईल असे अंबानी यांचे मत आहे. 

जिओ गिगाफायबरची पहिली घोषणा मागील वर्षी जुलै महिन्यात वार्षिक सर्वसाधारण सभेत अंबानी यांनी केली होती. त्यानंतर कंपनीने गिगाफायबरच्या नोंदणीला 1,100 शहरांत सुरूवातही केली होती. जिओने टेलिकॉम क्षेत्रात घडवून आणलेल्या बदलांप्रमाणेच ब्रॉडबॅंडच्या बाजारपेठेतही मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

गिगाफायबरच्या ऑफरमध्ये ग्राहकांना ब्रॉडबॅंड, आयपीटीव्ही आणि लॅंडलाईन कनेक्शनचे कॉम्बिनेशन फक्त 600 रुपयांत मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ग्राहकांना महिनाभरासाठी 100 जीबी डाटासुद्धा मिळू शकतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jio GigaFiber could launch on August 12, hints Mukesh Ambani