'जिओ'चा दिवाळी धमाका; जिओफोन फक्त ... रुपयांत!

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

मुंबई: रिलायन्स जिओने पुन्हा एकदा दिवाळी धमाका केला आहे. दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त गाठत जिओने फक्त  699 रुपयांमध्ये जिओफोन बाजारात आणला आहे. गेल्यावर्षी 1500 रुपयांत जिओफोन देण्यात आला होता. आता मात्र दिवाळी-दसऱ्याच्या मूहूर्तावर फक्त  699 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांची आठशे रुपयांची बचत होणार आहे.

या विशेष ऑफरनुसार ग्राहकांची जिओफोनवर 800 रुपयांची बचत आणि 700 रुपये किंमतीचा डेटा मिळणार आहे. ग्राहकांना पहिल्या सात रिचार्जवर कंपनीकडून 99 रुपयांचा अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजेच 1500 रुपयांचा हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 1500 रुपयांचा फायदा होणार आहे. 

1,500 रुपयांचा हा लाभ म्हणजे 'डिजिटल इंडिया'साठी जिओची दिवाळी भेट असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. ही ऑफर दिवाळीपर्यंतच असेल, त्यानंतर ग्राहकांना या फोनच्या खरेदीसाठी 1500 रुपये मोजावे लागणार आहेत. 

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले,“जिओ फोनमुळे भारतीयांना परवडणार्‍या दरात इंटरनेट उपलब्ध झाले आहे.‘जिओफोन दिवाळी गिफ्ट’ ऑफर करून, आम्ही प्रत्येक व्यक्तीला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणार आहोत. ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी डिजीटल इंडिया मिशनला निश्चित आणखी बळ मिळणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jio Phone to Get Special Price of Rs 699 for the Festive Season