नोकरी सोडलेल्यांना महिन्यानंतर ‘ईपीएफ’

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

नवी दिल्ली - नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यांना एक महिन्यानंतर त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीतील ७५ टक्के रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) घेतला आहे. 

‘कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजना १९५२’ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार, अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीतील ७५ टक्के रक्कम एक महिनानंतर; तर उर्वरित २५ टक्के रक्कम दोन महिन्यांनी काढता येणार आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचे खाते पुढे सुरू ठेवणे अथवा कायमस्वरूपी बंद करण्याची मुभाही या अंतर्गत देण्यात आल्याची माहिती कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job EPFO

टॅग्स