कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वॉलमार्ट करणार दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती

वृत्तसंस्था
शनिवार, 21 मार्च 2020

कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी अमेरिकेत विविध राज्यांमध्ये प्रवासावर बंदी घालण्यात आली असून लॉकडाउनसुद्धा करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांचा साठा करण्यास सुरूवात केली आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे अमेरिकेतील वाढती मागणी लक्षात घेऊन वॉलमार्ट दीड लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. याशिवाय 36.5 कोटी डॉलरच्या बोनसचे वाटपसुद्धा वॉलमार्ट करणार आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी अमेरिकेत विविध राज्यांमध्ये प्रवासावर बंदी घालण्यात आली असून लॉकडाउनसुद्धा करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांचा साठा करण्यास सुरूवात केली आहे. ऑनलाईन पद्धतीने वस्तू मागवण्याकडे ग्राहकांचा वाढता कल आहे. त्यामुळे वॉलमार्टमधील कामाचा बोझा वाढला आहे. भविष्यातील मागणी लक्षात घेऊन वॉलमार्ट दीड लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

या कर्मचाऱ्यांची नोकरी सुरूवातीला हंगामी स्वरुपाची असणार आहे आणि नंतर त्यांचे रुपांतर कायमस्वरुपी नोकरीत केले जाणार आहे. सध्या कंपनीत पूर्णवेळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वॉलमार्ट 300 डॉलरचा आणि अर्धवेळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 150 डॉलरचा बोनस देणार आहे. या कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय आरोग्य आपत्तीच्या वेळेस घेतल्या जात असलेल्या मेहनतीचे बक्षिस म्हणून हा बोनस दिला जाणार आहे. ऍमेझॉननेसुद्धा अमेरिकेत एक लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या योजनेची घोषणा याआधीच केली आहे. CoronaVirus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job Walmart hiring 1.5 lakh amid coronavirus pandemic offers cash bonuses