बिटकॉईन म्हणजे काय रे भाऊ?

कादंबरी नाईक, पुणे
सोमवार, 15 जानेवारी 2018

डिजिटल करन्सीचे एक रूप म्हणजे ‘बिटकॉईन’ होय. बिटकॉईन हे आभासी चलन असून, ते ऑनलाइन उपलब्ध असते. बॅंका किंवा सरकार हे चलन छापत नाही. मायनिंग या अत्यंत क्‍लिष्ट प्रक्रियेतून बिटकॉईन बनवली जातात. बिटकॉईनची चर्चा गेले काही दिवस चालू आहे, म्हणून आज त्याबद्दल जाणून घेऊयात...

डिजिटल करन्सीचे एक रूप म्हणजे ‘बिटकॉईन’ होय. बिटकॉईन हे आभासी चलन असून, ते ऑनलाइन उपलब्ध असते. बॅंका किंवा सरकार हे चलन छापत नाही. मायनिंग या अत्यंत क्‍लिष्ट प्रक्रियेतून बिटकॉईन बनवली जातात. बिटकॉईनची चर्चा गेले काही दिवस चालू आहे, म्हणून आज त्याबद्दल जाणून घेऊयात...

‘सा तोशी नाकामोटो’ या नावाखाली कोणा व्यक्ती किंवा गटाने बिटकॉईनचे तंत्रज्ञान २००८ मध्ये आणले. ‘सातोशी नाकामोटो’ची ओळख अद्याप समजली नाही. २०० मध्ये बिटकॉईनचे नेटवर्क अस्तित्वात आल्यानंतर हळूहळू याचा वापर वाढला. या व्हर्च्युअल करन्सीचा वापर करून जगातल्या कोणत्याही व्यक्तीला कुठूनही पेमेंट केले जाऊ शकते. याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पेमेंटसाठी कोणत्याही बॅंकेची गरज पडत नाही. बिटकॉईनचा वापर ‘पीअर टू पीअर’ या टेक्‍नॉलॉजीवर आधारित आहे. याचा अर्थ हा की बिटकॉईनच्या मदतीने ट्रान्झॅक्‍शन दोन कॉम्प्युटरच्या माध्यमातून केले जाऊ शकते. या ट्रान्झॅक्‍शनसाठी कोणत्याही बॅंकेची गरज पडत नाही. 

बिटकॉईन ही ओपन सोर्स करन्सी आहे. कारण यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशनची किंवा आयडीची गरज पडत नाही. मात्र एकदा बिटकॉईनच्या माध्यमातून ट्रान्झॅक्‍शन केल्यास कॅन्सल करता येत नाही. २००९ मध्ये अस्तित्वात आलेल्या बिटकॉईनने नुकताच १८ हजार डॉलरचा आकडा पार केला आहे. त्यामुळे हॅकर्ससोबतच बिटकॉईन आता गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत आहे. परदेशात याला मान्यता असली तरी भारतात अजून याला मान्यता मिळालेली नाही.

आजमितीस इंटरनेटवर १०.७१ दशलक्ष बिटकॉईन अस्तित्वात आहेत आणि ज्यांची किंमत २१० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास १३ अब्ज रुपये इतकी आहे आणि दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. चलनाचे विकेंद्रीकरण करून इंटरनेटवरील व्यवहारांसाठी एक समान चलन आणणे हे बिटकॉईनच्या अस्तित्वाचे मुख्य कारण आहे. 

हे चलन कुणीही घेऊ शकते. आपल्याकडील चलन देऊन याचे व्यवहार करणाऱ्या संकेतस्थळावरून याची खरेदी करता येते. आपल्याला हवे तेव्हा याची विक्री करता येते. सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपातच केले जातात. याला कसलाही रंग, रूप नाही. कागद, धातू अशा कोणत्याही भौतिक रूपात हे उपलब्ध नाही. सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन व्यवहारासाठी याचा उपयोग नाही. कोणत्याही देशाचे हे अधिकृत चलन नाही. परंतु अनेक देशांनी त्याला मान्यता दिली आहे. 

जपानने त्याला मान्यता दिल्यानंतर त्याचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट, तसेच अन्य काही कंपन्या या चलनाच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. अनेक कंपन्या, वेबसाइट्‌स त्याद्वारे व्यवहार करत आहेत. मागणी आणि पुरवठा या तत्त्वावर त्याच्या मूल्यात चढ-उतार होतात. याचे एकंदर व्यवहार सट्टाबाजाराप्रमाणे आहेत. ज्याप्रमाणे शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या शेअरचे मूल्य विविध कारणांनी वाढते किंवा कमी होते, तसेच याचे मूल्य कमी-जास्त होत असते.

Web Title: kadambari naik article bitcoin