Kisan Sanman| या लोकांना मिळणार नाही १२वा हप्ता; तुमचं नाव आहे का यादीत ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kisan Sanman

Kisan Sanman: या लोकांना मिळणार नाही १२वा हप्ता; तुमचं नाव आहे का यादीत ?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 12 वा हप्ता जारी करणार आहेत. याअंतर्गत सरकार 16,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत, सरकार प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला प्रत्येक वर्षी ठरावीक अंतराने प्रत्येकी दोन हजाराच्या तीन समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपये आर्थिक मदत देते.

अशा परिस्थितीत, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठीची पात्रता जाणून घ्यावी.

हेही वाचा: Work from home : सरकारी योजनेंतर्गत काम करा आणि घरबसल्या कमवा २० हजार रुपये

पीएम किसान सन्मान निधी योजनेची पात्रता (PMKSNY)

या योजनेसाठी अल्पभूधारक शेतकरी पात्र आहेत. शेतीयोग्य जमीन असलेले कोणतेही शेतकरी कुटुंब यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणारी व्यक्ती भारतीय असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी शहरी आणि ग्रामीण शेतकरी कुटुंबे अर्ज करू शकतात.

या लोकांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PMKSNY) लाभ मिळणार नाही.

असे लोक जे कोणतेही संवैधानिक पदावर आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

केंद्र सरकारमधील विद्यमान किंवा माजी मंत्री / राज्य सरकारमधील मंत्री, माजी किंवा विद्यमान लोकसभा / राज्यसभा खासदार, माजी किंवा विद्यमान आमदार, नगरपालिकेचे माजी किंवा विद्यमान महापौर, जिल्हा पंचायतीचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष या योजनेसाठी पात्र होणार नाहीत.

केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा कोणत्याही सरकारी उपक्रमात काम करणारे कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. तथापि, मल्टी टास्किंग कर्मचारी, वर्ग चतुर्थ आणि गट ड कर्मचाऱ्यांना यातून बाहेर ठेवण्यात आले आहे.

असे माजी सरकारी कर्मचारी (मल्टी-टास्किंग कर्मचारी, वर्ग IV आणि गट डी कर्मचारी वगळता) ज्यांचे पेन्शन दरमहा 10,000 पेक्षा जास्त आहे ते देखील या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2018 मध्ये सुरू झाली. योजना सुरू झाल्यानंतर अनेकांनी बनावट कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ घेतला होता, ज्यांचा हप्ता यावेळी येणार नाही. यासोबतच फसव्या मार्गाने योजनेचा लाभ घेणाऱ्यांकडूनही वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा

pmkisan.gov.in या PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

आता होम पेजच्या उजव्या बाजूला Farmers Corner विभागावर क्लिक करा.

शेतकरी कॉर्नर विभागातील लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.

आता पीएम किसान खाते क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा.

तपशील भरल्यानंतर Get Data वर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमची स्थिती स्क्रीनवर दिसेल.