esakal | या शेअरमध्ये आहे पैसे दुप्पट करण्याची क्षमता, जाणून घ्या कोणता आहे हा शेअर
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

या शेअरमध्ये आहे पैसे दुप्पट करण्याची क्षमता, जाणून घ्या कोणता आहे हा शेअर

sakal_logo
By
सुमित बागुल

कोरोनाच्या काळात बऱ्याच मोठ्या व्यवसायांना, कंपन्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. पण आता एकीकडे कोरोना कहर कमी होतो आहे दुसरीकडे आणि लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे लॉकडाउन वेगवेगळ्या राज्यात उघडत आहे. अनलॉक होत असल्याने बऱ्याच कंपन्यांच्या व्यवसायात गती येईल. या उद्योगांपैकी एक म्हणजे प्रिंटशी संबंधित मीडिया उद्योग. अनलॉकमुळे प्रिंट मीडियाचा प्रसार वाढेल आणि जाहिराती मिळतील. यामुळे त्या कंपन्यांच्या स्टॉक्सनाही चांगले दिवस येतील अशी आशा आहे. तुम्ही जर चांगला स्टॉक शोधत असाल तर हिंदुस्तान मीडिया व्हेंचरच्या स्टॉकचा (Hindustan Media Ventures) नक्की विचार अरा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. आज जाणून घेणार आहोत तज्ज्ञांनी नेमक्या कोणत्या स्टॉक्सची निवड केली आहे. (Know about Hindustan Media Ventures share)

हेही वाचा: AI आणि मशीन लर्निंगचा भन्नाट वापर; दारू प्यायला असाल तर तुमची कार सुरूच होणार नाही

शेअर्सना चांगले व्हॅल्यूएशन

अनलॉकचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे त्यात मीडिया इंडस्ट्रीचाही समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते हिंदुस्तान मीडिया व्हेंचर (Hindustan Media Ventures) मजबूत मीडिया ब्रँड आहे. यात 3 वृत्तपत्र आणि रेडिओ व्यवसाय आहे. अनलॉक प्रिंट मीडिया व्यवसाय वेग वाढवेल असा अंदाज आहे. कंपनीच्या 2 मोठ्या गुंतवणूकदारांनी आपला हिस्सा विकला आहे, त्यामुळे विक्री बंद होताना दिसते आहे आणि आता इथून पुढे हा स्टॉक तेजीत येईल.

स्टॉकमध्ये पैसे दुप्पट करण्याची क्षमता

कंपनीचे प्रमोटर्स मजबूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, कंपनीत प्रमोटर्सचा जवळपास 75 टक्के हिस्सा आहे. एफआयआयचाही तब्बल 14 टक्के हिस्सा आहे. बॅलेन्सशीट खूप मजबूत आहे. स्वस्त व्हॅल्यूएशनवर मिळत असलेला हा स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये 135 रुपयांपर्यंत वाढू शकतो. तर मिड टु लॉन्ग टर्ममहद्ये 160 ते 180 रुपयांची वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होण्याची क्षमता आहे.

हेही वाचा: दोन अवलियांचा भन्नाट स्टार्ट-अप, पाणी पिण्यासाठी Eco-friendly बॉटल्स

मजबूत मॅनेजमेंट

कंपनीची बॅलेन्सशीट खूप मजबूत अत्यंत मजबूत आहे आणि हीच सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. त्यात कंपनी सुमारे 100 वर्ष जुनी आहे. तर कंपनीची सुमारे 1000 कोटींची गुंतवणूक आहे. मॅनेजमेंट चांगले काम करत आहे आणि सर्वांगीण वाढीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. हा स्टॉक प्रमोटरच्या आवडीचा आहे. 585 कोटींची मार्केट कॅप आहे. येत्या काळात Hindustan Media Ventures च्या स्टॉक चांगली वाढ होऊ शकते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image