पर्सनल लोन घेताय? मग 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या!

पर्सनल लोन हा कर्जाचा एक विश्वासार्ह पर्याय आहे
personal loan
personal loan

भारताच्या सतत विकसित होत असलेल्या ‘क्रेडिट लँडस्केप’वरून हे निदर्शनास येत आहे की पर्सनल लोन सारख्या छोट्या वित्तीय पर्यायांचा लाभ घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. परिणामी २०२२ या वित्तीय वर्षात पर्सनल लोन विभागात १४७,२३६ कोटीची लक्षणीय वाढ झाली असून १५.८ दशलक्ष नवीन खातीही वाढली आहेत.

निधीची तत्काळ उपलब्धता आणि लवचिक वापर यामुळे वाढ बळकट होऊ शकते. पर्सनल लोन हा कर्जाचा एक विश्वासार्ह पर्याय आहे जो एखाद्या व्यक्तीला पैशांची नितांत आवश्यकता असताना त्याच्या बचावासाठी येतो. तत्पूर्वी पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी, कर्जदारांना या पर्यायाच्या विविध उल्लेखनीय वैशिष्ट्यांबद्दल सर्व बाजूंनी कल्पना असणे आवश्यक आहे.

पर्सनल लोन चा लाभ घेण्यापूर्वी कर्जाच्या बद्दल वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेण्याच्या आवश्यक बाबी : कर्जदारांना पर्सनल लोन च्या विविध वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यापूर्वी काही बाबींची सखोल कल्पना असणे आवश्यक आहे :

कर्जाच्या रकमेचा लक्षणीय भाग : पर्सनल लोन संदर्भातील महत्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे लक्षणीय कर्ज रकमेची उपलब्धता जी कर्जदारांना त्यांच्या बचतीवर ताण न ठेवता आर्थिक आणीबाणीचा सामना करण्यास मदत करते.

जलद वितरण : पर्सनल लोन चा लाभ घेतल्यास कर्जाच्या रकमेचे जलद वितरण सुनिश्चित होते. तथापि, पर्सनल लोन पात्रता निकषाची (Personal Loan Eligibility Criteria) पूर्तता आणि योग्य क्रेडिट स्कोअर असणे या बाबी कर्ज वितरणात महत्वाची भूमिका बजावतात.

सोप्या प्रकारे पात्रता निकषांची पूर्तता : पर्सनल लोन मिळविण्यासाठी कर्जदारांनी काही साध्या निकषांचे पालन करणे आवश्यक असून कर्जास पात्र होण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.

त्याचे/तिचे वय २१ ते ६७* वर्ष वयोगटादरम्यान असावे.

पगारदार व्यक्तीकडे उत्पन्नाचा एका स्थिर स्त्रोत असणे आवश्यक असून एका नामांकित संस्थेत ती कार्यरत असावी.

कर्जाच्या तत्काळ मंजुरीसाठी सीबील(CIBIL) स्कोअर ७५० किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

साधे दस्तऐवज(डोक्युमेंटेशन) : कर्जदार काही मूलभूत कागदपत्रे सादर करून कर्जाच्या अर्जाची प्रक्रिया जलद आणि सोपी करून सहज कर्ज मंजूरी मिळवू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसह, कर्जदारांना कर्जाच्या रकमेसाठी त्वरित मंजूरी मिळविण्यासाठी स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

तारण ठेवण्याची आवश्यकता नाही : पर्सनल लोन हा कर्जाचा एक असुरक्षित पर्याय आहे, जो सूचित करतो की कर्जदारांना त्यांची मालमत्ता गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही. त्यांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यास आणि लांबलचक दस्तऐवज पडताळणी प्रक्रिया टाळण्यास यामुळे मदत मिळते. म्हणून, कर्जाचा हा पर्याय त्वरित आर्थिक सहाय्य प्राप्त करण्यासाठी आदर्श मानला जातो.

लवचिक वापर : पर्सनल लोन चे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जाच्या रकमेचा हवा तसा उपयोग करता येणे. कर्जदार मंजूर रकमेचा वापर मुलाच्या शिक्षणासाठी वित्तपुरवठा करण्यापासून, लग्नाचा खर्च, व्यवसायाचा विस्तार आदींसह अनेक आर्थिक गरजांसाठी आपल्या गरजेनुसार करू शकतात.

परतफेडीचा लवचिक कालावधी : पर्सनल लोन ६० महिन्यांच्या विस्तारित परतफेड कालावधीसह मिळत असल्याने कर्जदारांना कर्जाची रक्कम सोयीस्करपणे परतफेड करण्यास मदत करते. या संदर्भात, कर्जदारांनी त्यांच्या परतफेडीच्या क्षमतेस अनुरूप असा योग्य पर्सनल लोन कालावधी शोधला पाहिजे जेणे करून त्यांना इतर आर्थिक कर्तव्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत मिळते.

परवडणारा व्याज दर: परवडणारे ईएमआय पाडून कर्जदार परवडणाऱ्या पर्सनल लोन व्याज रेट (Personal Loan Interest Rate) वर कर्जाच्या पर्यायाचा लाभ घेऊ शकतात. ज्यामुळे कर्जदारांना परतफेडीच्या कालावधीत कर्जाची रक्कम परत करण्यास मदत मिळते. तत्पूर्वी कर्जदारांना कर्जाची किंमत कमी करण्यासाठी पर्सनल लोनवर चांगला व्याजदर कसा मिळवायचा हे माहीत असणे आवश्यक आहे.

जाणून घ्या पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज कसा करावा :

पर्सनल लोन साठी ऑनलाइन अर्ज करताना मार्गदर्शक ठरणार्‍या पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत.

स्टेप १ : कर्जपुरवठा करणार्‍या एखाद्या वित्तसंस्थेच्या अधिकृत वेबसाईट जा आणि पर्सनल लोन चा पर्याय निवडा.

स्टेप २ : अप्लाय ऑनलाईन हा पर्याय निवडून आवश्यक तपशीलासह ऑनलाईन अर्ज भरा.

स्टेप ३ : इच्छित कर्जाची रक्कम भरून फॉर्म सबमीट करा.

कर्जदार त्वरित कर्ज देणार्‍या इन्स्टंट लोन अॅप्सवरून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात आणि पुढील सोयीसाठी निधी मिळविण्यासाठी त्वरित प्रवेश मिळवू शकतात.

अर्जाची प्रक्रिया जाणून घेण्यासोबतच, कर्जदारांनी पर्सनल लोन साठी अर्ज करताना कुठल्या चुका टाळाव्या हे जाणून घेणेही आवश्यक आहे.

शिवाय, कर्जदार, कर्ज देणार्‍या संस्थांनी, जसे की बजाज फायनान्स ने पर्सनल लोन, व्यवसाय कर्ज, क्रेडिट कार्ड इ. यासारख्या विस्तृत वित्तीय उत्पादनांवर विस्तारित केलेल्या विशेष पूर्व-मंजूर ऑफर पाहू शकतात. या ऑफर कर्जाच्या अर्ज प्रक्रियेला गती देतात. इच्छुक कर्जदार त्याचे नाव आणि संपर्काचा तपशील सबमिट करून त्यांच्या पूर्व-मंजूर ऑफर्स तपासू शकतात.

थोडक्यात सारांश असा की पर्सनल लोन हा वित्तपुरवठ्याचा एक व्यवहार्य पर्याय आहे जो कर्जदारांना त्वरित निधी उपलब्ध करून देण्यास मदत करतो, ज्यामुळे तो आर्थिक निकडीचा सर्वोत्तम पर्याय बनतो. तथापि, कर्ज घेणे फायद्याचे बनविण्यासाठी, कर्जदारांना वैयक्तिक कर्जाच्या वैशिष्ट्यांची पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे. शिवाय, कर्जदारांनी पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी कर्जपुरवठा करणार्‍या वेगवेगळ्या वित्तसंस्थांची तुलना देखील केली पाहिजे.

*नियम आणि अटी लागू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com