esakal | कोचर दाम्पत्याला ‘ईडी’चे समन्स
sakal

बोलून बातमी शोधा

Kochhar-Couple

व्हिडीओकॉन कर्ज गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना समन्स बजावून चौकशीसाठी पाचारण केले आहे. पुढील आठवड्यात त्यांची स्वतंत्रपणे चौकशी होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

कोचर दाम्पत्याला ‘ईडी’चे समन्स

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - व्हिडीओकॉन कर्ज गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना समन्स बजावून चौकशीसाठी पाचारण केले आहे. पुढील आठवड्यात त्यांची स्वतंत्रपणे चौकशी होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

गेत आठवड्यात हे समन्स पाठविण्यात आले असून, त्यानुसार चंदा कोचर यांना ३ मे रोजी; तर दीपक कोचर व त्यांचे बंधू राजीव यांना ३० एप्रिलला चौकशीला उपस्थित राहावे लागणार आहे. ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत त्यांचे जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत. त्यांनी येताना आर्थिक व्यवहारांशी निगडित कागदपत्रे आणावीत, असे निर्देशही ‘ईडी’ने दिले आहेत.

दरम्यान, व्हिडीओकॉन समूहाला नियमबाह्य डावलून कर्ज दिल्याचा आरोप चंदा यांच्यावर असून, ‘ईडी’ने याप्रकरणी कोचर दाम्पत्यासह व्हिडीओकॉन समूहाचे वेणुगोपाल धूत यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. १ मार्चला ‘ईडी’ने त्यांच्या निवासस्थानासह अन्य ठिकाणी छापे टाकले होते.

loading image