कोटक महिंद्रा बँकेकडून व्याजदर कपात; बॅंकेने बचत खात्यावरील व्याजदर घटवले

वृत्तसंस्था
Tuesday, 26 May 2020

रिझर्व्हबँकेकडून रेपोदरात कपात केल्यानंतर बँकांकडून ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरात सतत कपात केली जात आहे.बँकेने महिनाभरात सलग दुसऱ्यांदा व्याजदर कपात केली आहे

मुंबई -  देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेने बचत खात्यावरील व्याज दरात कपात जाहीर केली आहे. बँक एक लाख आणि त्याहून अधिक रक्कम असणाऱ्या खात्यांसाठी 4 टक्के दराने व्याज देणार आहे. त्यात अर्ध्या टक्क्याची कपात करण्यात आली आहे. याआधी तो 4.50 टक्के होता. तसेच एक लाखांहून कमी रक्कम असणाऱ्या खात्याला आता 3.50 टक्के व्याज दिले जाईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांकडून ठेवी आणि कर्जाच्या व्याज दरात सतत कपात केली जात आहे. बँकेने महिनाभरात सलग दुसऱ्यांदा व्याजदर कपात केली आहे.

* कोटक महिंद्रा बँकेकडून बचत खात्यावरील व्याज दरात कपात जाहीर
* बँक एक लाख आणि त्याहून अधिक रक्कम असणाऱ्या खात्यांसाठी 4 टक्के दराने व्याज देणार 
* एक लाखांहून कमी रक्कम असणाऱ्या खात्याला 3.50 टक्के व्याज 
* रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांकडून ठेवी आणि कर्जाच्या व्याज दरात कपात
* व्याजदर कपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठांना

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

व्याजदर कपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठांना: 
बहुतांश निवृत्तीवेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिक बँकेतून मिळणाऱ्या व्याजावर मासिक खर्च भागवतात. मात्र व्याजदर कमी झाल्याने त्यांना मिळणारा परतावा कमी होणार आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात 0.40 टक्क्याची कपात केली होती. यामुळे रेपो दर 4 टक्क्यांवर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kotak Mahindra Bank reduces the interest rate