उत्तम खरेदी - KPIT टेक

केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे मूलभूत उद्योग वर्गीकरण संगणक-सॉफ्टवेअर व सल्लामसलत आणि प्रचंड ‘मार्केट कॅप’सह माहिती तंत्रज्ञान उद्योगांतर्गत येते.
KPIT Tech
KPIT Tech sakal

ऋत्विक जाधव

केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे मूलभूत उद्योग वर्गीकरण संगणक-सॉफ्टवेअर व सल्लामसलत आणि प्रचंड ‘मार्केट कॅप’सह माहिती तंत्रज्ञान उद्योगांतर्गत येते. पुणेस्थित ही एक आघाडीची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे;

जी स्वच्छ, स्मार्ट, सुरक्षित भविष्यासाठी मदत करते. एम्बेडेड सॉफ्टवेअर, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि डिजिटल सोल्युशन्समध्ये तज्ज्ञ असलेल्या जगभरातील १० हजारांहून अधिक ऑटोमोबाईल उत्पादक विश्वासणारे असून, त्यांची केंद्रे युरोप, अमेरिका, जपान, चीन, थायलंड आणि भारत येथे आहेत. कंपनीला तिच्या गुंतवणूकदारांसाठी मजबूत मूलभूत पाठबळ आहे. ५१ पेक्षा जास्त पेटंट्स, २५ इनोव्हेशन ॲवॉर्ड्स यामुळे ती भांडवल करण्यासाठी योग्य कंपनी बनते.

शेअरचा इतिहास

२२ एप्रिल २०१९ रोजी रु. ९९ वर नोंदणी झालेल्या, या शेअरने आजपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टी-बॅगर परतावा दिला आहे. त्याची गणना केली, तर त्याच्या नोंदणीच्या दिवसापासून सुमारे ७५० टक्के होतात. चार्टवर, हा शेअर सुरुवातीच्या टप्प्यापासून वरच्या ‘ट्रेंड’मध्ये होता आणि २०२२ च्या सुरुवातीपासून काही ‘प्रॉफिट बुकिंग’ दिसले; पण त्याच वर्षाच्या अखेरीस तो पुनर्प्राप्त झाला. तांत्रिकदृष्ट्या, चार्टवर मजबूत सकारात्मक सामर्थ्य दर्शवित असून, आगामी दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दर्शवतो.

या विशिष्ट शेअरचा चार्टपॅटर्न इतरांच्या तुलनेत सर्वांत मजबूत आहे. सध्‍या उच्चांकी बाजारपातळी आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्‍ये सामर्थ्य आणि भविष्यातील चढ-उतार दर्शवत आहे. ‘ओपन ब्लू स्काय टेरिटरी’, नो रेझिस्टन्स झोन आणि निफ्टी व सेन्सेक्स लक्षणीयरीत्या सुधारले असताना, याला चार्टवर सकारात्मक विचलन असेही म्हणतात. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. २०२२ मध्ये आम्ही चांगले एकत्रिकरण पाहिले आहे आणि आता चार्टने पुरवठा क्षेत्रापेक्षा एक परिपूर्ण ब्रेकआउट दिला आहे,

जो हा शेअर एका वर्षापेक्षा जास्त काळ धारण करत होता. प्राइस पॅटर्न ब्रेकआउटला तांत्रिकदृष्ट्या कंटिन्यूएशन पॅटर्न असे म्हणतात. याला ‘चढत्या त्रिकोण किंमतीचा पॅटर्न’ असेही म्हटले जाते, ज्यात तेजीचे परिणाम आहेत. अधिक पुष्टीकरणासाठी शेअरने प्रचंड ताकद दाखवून आणि मजबूत चार्ट स्ट्रक्चर तयार करून प्रचंड व्हॉल्यूमसह प्रतिकार क्षेत्र बाहेर काढले आहे. रु. ८५५ च्या आसपास ट्रेडिंग करताना, साप्ताहिक बंद आधारावर रु. ७५० चा स्टॉपलॉस ठेवून रु. ८७०-८०० च्या श्रेणीमध्ये शेअर जमा करणे सुरू केले पाहिजे.

येत्या आठवड्यात या शेअरमध्ये मोठी तेजी दिसण्याची शक्यता आहे. अल्पावधीत, रु. ११०० ही आमची लक्ष्य किंमत असेल, जी किमतीच्या पॅटर्नने सुचवलेले तात्काळ लक्ष्य आहे. मध्यम मुदतीच्या चित्रासह पुढील लक्ष्य रु. १३५० आहे, जे तांत्रिक किंमतीच्या पॅटर्नवर देखील आधारित आहे. या परिप्रेक्ष्यातील मध्यम-मुदतीच्या लक्ष्यासह, रिस्क टू रिवॉर्ड रेशो १:४.८ आहे, जो जोखीम व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपला गुंतवणूक निर्णय आणखी योग्य ठरवतो. छोटी जोखीम घेऊन, मोठ्या लक्ष्यांची अपेक्षा करीत आहोत, नजीकच्या भविष्यात ५८ टक्क्यांच्या आसपास किमान नफा अपेक्षित आहे.

(टीप : या लेखातील शिफारस पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित आहे, जी भविष्यातील किमतीच्या हालचालीचा अंदाज लावण्याचा एक प्रकारचा वैज्ञानिक मार्ग आहे. सर्व गुंतवणूकदारांनी शेअर गुंतवणुकीतील जोखमींबद्दल योग्य माहिती घेऊन आपापल्या जबाबदारीवर निर्णय घ्यावेत. लेखकाचे यात कोणतेही वैयक्तिक हितसंबंध नाहीत.)

(लेखक किरण जाधव अँड असोसिएटसमध्ये तांत्रिक विश्लेषक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com