महिला दिन विशेष : तुम्हास माहिती आहे का?

आज सर्व स्तरांवर महिला या त्यांच्या क्षमतेनुसार व्यवसाय, नोकरी करीत आहेत. म्हणजे आज चूल-मूलपासून विमान चालवणे ते अगदी देशाचा अर्थसंकल्पपण महिला सादर करीत आहेत.
महिला दिन विशेष : तुम्हास माहिती आहे का?
Summary

आज सर्व स्तरांवर महिला या त्यांच्या क्षमतेनुसार व्यवसाय, नोकरी करीत आहेत. म्हणजे आज चूल-मूलपासून विमान चालवणे ते अगदी देशाचा अर्थसंकल्पपण महिला सादर करीत आहेत.

आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आपण कायमच महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याबद्दल बोलतो आणि बऱ्याच अंशी त्यावर कामसुद्धा केले गेले आहे आणि चालू आहे. पण फक्त स्वातंत्र्य देऊन त्याचा महिलांना यथायोग्य फायदा होईल का? म्हणजे समजा, मी तुम्हाला कार दिली म्हणजे तुम्हाला कार वापरता येईल का, तर नाही. मला तुम्हाला कार चालवण्याचे प्रशिक्षण देणेपण तितकेच गरजेचे आहे.

आज सर्व स्तरांवर महिला या त्यांच्या क्षमतेनुसार व्यवसाय, नोकरी करीत आहेत. म्हणजे आज चूल-मूलपासून विमान चालवणे ते अगदी देशाचा अर्थसंकल्पपण महिला सादर करीत आहेत. सुमारे ९९ टक्के घरांमध्ये घर चालवण्याचे क्लिष्ट काम या महिलाच करताना दिसतात. खरे तर घराचे पूर्ण बजेट हे महिलांच्या हातात आहे. म्हणजे पैसे कमावणे आणि खर्च करणे या बाबतीत महिलांचा सहभाग हा पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे.

पण पैसा गुंतवणे आणि पैसा वाढवणे या बाबतीत महिलांची फारशी किंवा आवश्यक तेवढी प्रगती झाली नाही, हे मान्य करावे लागेल. आजही उच्चशिक्षित महिला या त्यांचे वडील, नवरा किंवा मुलगा सांगेल तिथे पैसे गुंतवतात. वडील, नवरा किंवा मुलगा सांगेल तिथे डोळे झाकून सह्या करतात.

कोणीतरी बघतंय ना मग आपण कशाला त्रास करून घ्यायचा, असा साधा सरळ विचार.पण काळ बदलत आहे. जेवढ्या चिकित्सक पद्धतीने महिला साडी, ड्रेस आणि अगदी भाजी घेतात ना, तेवढ्याच किंवा काकणभर जास्त चिकित्सकपणे गुंतवणूक, विमा, व्याज, कररचना आदींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

पण आर्थिक साक्षरता येणे म्हणजे नक्की काय तेपण नीट समजणे महत्त्वाचे आहे. महिलांनी खाली दिलेले प्रश्न स्वतःला विचारावेत, म्हणजे त्या स्वतः आर्थिकदृष्ट्या योग्य प्रमाणात साक्षर आहेत की नाहीत, हे त्यांना समजेल.

प्रश्न उत्तर नाही (गुण) उत्तर होय (गुण)

तुम्हाला बचत आणि गुंतवणूक यामधील फरक समजतो का? ० १

तुमच्या घराच्या एकूण उत्पन्नापैकी किती पैसे तुम्ही गुंतवणे आवश्यक आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? ० २

तुम्हाला तुमच्या निवृत्तीसाठी किती पैसे साठवले पाहिजेत हे सांगता येईल का? ० २

तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या उच्च शिक्षणासाठी, तुम्हाला भविष्यात किती पैशांची गरज भासणार आहे, हे तुम्ही सांगू शकता का? ० २

तुम्ही तुमच्या घरातील आर्थिक बाबींमध्ये लक्ष घालता का? ० १

तुम्हाला आरोग्य विमा आणि आयुर्विमा यातील फरक समजतो का? ० १

आयुर्विमा कोणाचा काढावा हे तुम्हाला माहिती आहे का? ० १

आरोग्य विमा कोणाचा काढावा हे तुम्हाला माहिती आहे का? ० १

तुम्हाला व्यक्तिगत कररचना आणि त्यांचे टप्पे माहिती आहेत का? ० १

तुम्हाला पीपीएफ, मुदत ठेव, पोस्टातील ठेवी याबद्दल सविस्तर माहिती आहे? ० २

तुम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे काय ते माहिती आहे का? ० १

तुम्हाला म्युच्युअल फंडांचे प्रकार काय आहेत ते माहिती आहे का? ० २

तुम्ही स्वतः म्युच्युअल फंडाची निवड करू शकता का? ० ३

तुम्हाला महागाईचा दर म्हणजे काय ते समजते का? ० १

तुम्हाला क्रेडिट कार्डवर व्याज कधी आकारले जाते आणि ते किती टक्के असते, हे माहिती आहे का? ० २

एक महिला म्हणून तुमचा तुमच्या नवऱ्याच्या, वडिलांच्या मालमत्तेमध्ये किती हक्क आहे, हे माहिती आहे का? ० १

तुमच्या कुटुंबाची कोठे आणि किती गुंतवणूक आहे?, त्याची कागदपत्रे कोठे आहेत, याची माहिती आहे का? ० २

तुम्हाला कोणत्या कामासाठी कोणाची मदत घ्यावी, हे सांगता येईल का? जसे की - सीए, वकील, विमा सल्लागार, गुंतवणूक सल्लागार. ० २

तुमच्या नवऱ्याच्या पश्चात तुमचा कोठे आणि किती हक्क असेल, हे माहिती आहे का? ० १

घटस्फोट झाला तर महिला म्हणून तुमचे काय हक्क आहेत आणि काय जबाबदाऱ्या आहेत, हे माहिती आहे का? ० १

नामनिर्देशन करणे आणि इच्छापत्र करणे यातील फरक तुम्हाला समजतो का? ० १

खालील तक्त्यात तुम्ही तुमचे गुण आणि त्या अनुषंगाने तुमचे ज्ञान कसे आहे, ते तपासू शकता.

गुण अर्थ

१० पेक्षा कमी तुमचे आर्थिक ज्ञान खूप कमी आहे.

१० पेक्षा जास्त, पण १५ पेक्षा कमी तुमचे आर्थिक ज्ञान बेताचे आहे.

१५ पेक्षा जास्त, पण २० पेक्षा कमी तुमचे आर्थिक ज्ञान साधारण आहे.

२० पेक्षा जास्त, पण २५ पेक्षा कमी तुमचे आर्थिक ज्ञान साधारण चांगले आहे.

२५ पेक्षा जास्त तुमचे आर्थिक ज्ञान चांगले आहे.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर- सीएफपी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com