लँडमार्क कार्सचा 762 कोटींचा आयपीओ लवकरच येणार! सेबीकडे DRHP दाखल

येत्या काही दिवसात अनेक कंपन्या आपले आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत
IPO
IPOIPO
Updated on

शिल्पा गुजर

Landmark Cars IPO: शेअर बाजारात नवनवीन कंपन्यांच्या लिस्टिंगची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 2021 मध्ये, गुंतवणूकदारांनी आयपीओमधून( IPO) मधून भरपूर पैसे कमावले. त्यामुळेच येत्या काही दिवसात अनेक कंपन्या आपले आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. यापैकी एक कंपनी ऑटोमोबाईल डीलरशिप चेन लँडमार्क कार्स लिमिटेड (Landmark Cars) आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे.

IPO
EPS 95 Pensioner: पेन्शन महिन्याच्या या दिवशी होणार खात्यात जमा, नियमात बदल

पीटीआयच्या मते, या ओएफएसकडून (OFS) 612 कोटी उभारण्याची योजना असल्याचे मार्केट रेग्युलेटरकडे दिलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मध्ये म्हटले आहे. याअंतर्गत 150 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत 612 कोटी रुपयांचे शेअर्स विकले जातील. OFS मध्ये TPG ग्रोथ II SF Pte Ltd द्वारे 400 कोटी रुपयांपर्यंत शेअर्सची विक्री आणि संजय करसनदास ठक्कर HUF द्वारे 62 कोटी रुपयांपर्यंत शेअर्सची विक्री केली जाईल. याशिवाय, आस्था लिमिटेडद्वारे 120 कोटी रुपयांपर्यंत आणि गरिमा मिश्रा यांच्या 30 कोटी रुपयांपर्यंतच्या शेअर्सची विक्री OFS अंतर्गत केली जाईल. इश्यूमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठीही राखीव जागा असणार आहे. फ्रेश इक्विटी सेलमधून मिळालेल्या निधीपैकी 120 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि व्यावसायिक गोष्टींसाठी वापरले जातील. अॅक्सिस कॅपिटल आणि ICICI सिक्युरिटीज हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. लँडमार्क कार्सने आर्थिक वर्ष 2021 मध्ये 11.15 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

IPO
AGS Transact IPO आजपासून खुला; गुंतवणूक करावी की नाही? जाणून घ्या

लँडमार्ककडे प्रीमियम ब्रँड डीलरशिप

TPG समर्थित लँडमार्क कार्स हा भारतातील मर्सिडीज-बेंझ, होंडा, जीप, फोक्सवॅगन आणि रेनॉल्टच्या डीलरशिपसह एक प्रमुख प्रीमियम ऑटोमोटिव्ह रिटेल व्यवसाय आहे. ऑटोमोटिव्ह रिटेल व्हॅल्यू चेनमध्ये लँडमार्क कार समाविष्ट आहे. कंपनी कार सेल्‍स, ऑफ्टर सेल्‍स सर्व्हिस, स्पेयर पार्ट्स, लुब्रिकंट्स आणि एसेसरीजसह पॅसेंजर कार्ससुद्धा विकते.

आर्थिक वर्ष 2021 मध्ये, लँडमार्क डीलरशिपने मर्सिडीजसाठी 1,133 वाहने आणि Honda आणि Renault साठी 4,000 पेक्षा जास्त कार विकल्या. कंपनीने सर्व ब्रँडमध्ये 1.3 लाखांहून अधिक कार विकल्या आहेत. अलीकडेच, कंपनीने मुंबई आणि दिल्ली-NCR मध्ये MP6 इलेक्ट्रिक वाहन विकण्यासाठी जागतिक EV जायंट BYD सोबत भागीदारी केली आहे.

IPO
Tata Group च्या या स्टॉकवर तज्ज्ञांचा वाढता विश्वास

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com